Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

BEST Bus Conductor Recruitment 2026 : 364 जागांसाठी सरळसेवा भरती | 10वी पास उमेदवारांना संधी | Apply Online

  • July 10, 2026
BEST Bus Conductor Recruitment 2026 : 364 जागांसाठी सरळसेवा भरती | 10वी पास उमेदवारांना संधी | Apply Online

BEST Bus Conductor Recruitment 2026 :

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम अर्थात BEST उपक्रमाने बस वाहक (कंडक्टर) या पदासाठी सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 364 जागा भरल्या जाणार असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब व क), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 08 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.bestundertaking.com वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला BEST Bus Conductor भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

BEST Bus Conductor Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Jalna DCC Bank Recruitment 2026 तसेच HPCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
बस वाहक (Bus Conductor) – 364 Post

आरक्षणानुसार पदे –
अनुसूचित जाती (SC) – 34 Post
अनुसूचित जमाती (ST) – 22 Post
विमुक्त जाती (A) – 06 Post
भटक्या जमाती (B) – 06 Post
भटक्या जमाती (C) – 10 Post
विशेष मागास प्रवर्ग (SBC) – 05 Post
इतर मागासवर्ग (OBC) – 67 Post
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) – 36 Post
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक (SEBC) – 36 Post
खुला प्रवर्ग (Open)– 142 Post

Total Post – 364 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
08 जुलै 2026 ते 29 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ खुला प्रवर्ग : Rs.1000/-
राखीव प्रवर्ग : Rs.900/-
वयोमर्यादा (Age Limit):
खुला प्रवर्ग – 18 वर्षे ते 38 वर्षे
मागासवर्गीय 18 वर्षे ते 43 वर्षे
वेतनश्रेणी (Pay Scale):
मूळ वेतन : Rs.22,060/-
✔ महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, BEST बसमधून मोफत प्रवास सुविधा
✔ एकूण अंदाजे मासिक उत्पन्न : Rs.36,000/-
नोकरी ठिकाण (Job Location):
मुंबई
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ संगणक आधारित बहुपर्यायी परीक्षा (CBT)
कागदपत्र पडताळणी
अंतिम निवड
शैक्षणिक पात्रता (Qualification):
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) किंवा तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
✔ SSC परीक्षेत किंवा उच्चतम परीक्षेत मराठी विषयात किमान 100 पैकी 50 गुण (निम्नस्तर किंवा उच्चस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक
.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA), महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नुतनीकरण केलेला वैध बसवाहक परवाना व बिल्ला (Badge) आवश्यक,
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 शारीरिक पात्रता –

  • उंची : किमान 154 सेमी, कमाल 178 सेमी पेक्षा जास्त नसावी.
  • वजन : किमान 45 किलो

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ www.bestundertaking.com वर जा.
  • संकेतस्थळावरील “Recruitment” या टॅबवर क्लिक करा.
  • “बस वाहक भरती 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी (Registration) करून लॉगिन आयडी तयार करा.
  • मागितलेली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे व फोटो स्कॅन करून अपलोड करा.
  • प्रवर्गानुसार ऑनलाईन परीक्षा शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट स्वतःकडे जपून ठेवा.

📌 Exam Pattern

घटकतपशील
परीक्षेचा प्रकारसंगणक आधारित बहुपर्यायी परीक्षा (CBT)
प्रश्नांचा प्रकारबहुपर्यायी (Multiple Choice Questions)
एकूण गुण90 गुण
विषय
  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी)
किमान पात्रता गुणप्रत्येक विषयात किमान 3 गुण मिळवणे आवश्यक.
एकूण पात्रताएकूण सरासरी किमान 12 गुण मिळवणे आवश्यक.

महत्त्वाची सूचना:

  • बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित (CBT) बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
  • उमेदवारांची संख्या जास्त असल्यास परीक्षा एकापेक्षा अधिक शिफ्टमध्ये घेतली जाऊ शकते.
  • अशा परिस्थितीत गुणांचे सामान्यीकरण (Normalization Method – Mean Standard Deviation Method) करण्यात येईल.
  • सामान्यीकरणाची पद्धत अधिकृत जाहिरातीच्या जोडपत्र ‘ब’ मध्ये दिलेल्या सूत्रानुसार लागू करण्यात येईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. BEST उपक्रम बस वाहक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉या भरतीद्वारे बस वाहक पदाच्या एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत.

Q2. बस वाहक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 SSC किंवा तत्सम परीक्षा सरासरी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण, तसेच मराठी विषयात किमान 100 पैकी 50 गुण आवश्यक आहेत. यासोबत RTA महाराष्ट्र राज्याचा वैध बसवाहक परवाना व बिल्ला असणे आवश्यक आहे.

Q3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे ही वयोमर्यादा आहे (दि. 29.07.2026 रोजी गणली जाईल).

Q4. बस वाहक पदासाठी परीक्षा शुल्क किती आहे?

👉खुल्या प्रवर्गासाठी रु. 1000/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 900/- इतके परीक्षा शुल्क आहे.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉निवड प्रक्रिया संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT) द्वारे होईल, ज्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, आणि भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) या विषयांचा समावेश असेल.

Q6. अर्ज कोठे करावा लागेल?

👉अर्ज BEST उपक्रमाच्या अधिकृत संकेतस्थळ www.bestundertaking.com वरून ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

Q7. नियुक्ती कशी केली जाईल?

👉सुरुवातीला “बदली बस वाहक” म्हणून नियुक्ती केली जाईल. समाधानकारक सेवा झाल्यानंतर कायम नियुक्ती केली जाईल.

    Share this job