Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

SSC CHSL Recruitment 2026 : 2536 जागांसाठी 12वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी | Apply Online

  • September 08, 2026
SSC CHSL Recruitment 2026 : 2536 जागांसाठी 12वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी | Apply Online

SSC CHSL Recruitment 2026 :

कर्मचारी निवड आयोगामार्फत (Staff Selection Commission – SSC) Combined Higher Secondary (10+2) Level (CHSL) Examination, 2026 आयोजित करण्यात येत असून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, कार्यालये तसेच विविध Constitutional/Statutory Bodies आणि Tribunals मध्ये Lower Divisional Clerk (LDC)/Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO) आणि Data Entry Operator Grade ‘A’ या Group C पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी सध्या अंदाजे 2536 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. अंतिम रिक्त पदसंख्या नंतर निश्चित केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 07 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2026 आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला SSC CHSL भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

SSC CHSL Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS RRB Recruitment 2026 तसेच SBI Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Lower Divisional Clerk (LDC)
✔ Junior Secretariat Assistant (JSA)
✔ Data Entry Operator (DEO)
✔ Data Entry Operator, Grade ‘A’

Total Post – 2536 Post (Tentative)
महत्वाच्या तारखा (Important Dates):
07 सप्टेंबर 2026 ते 07 ऑक्टोबर2026

अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 08 ऑक्टोबर 2026
Application Form Correction – 14 ऑक्टोबर 2026 ते 16 ऑक्टोबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / EWS / OBC (सर्वसाधारण/खुला प्रवर्ग) : Rs.100/-
✔ SC / ST / PwBD / महिला / Ex-Servicemen : NIL

अर्ज दुरुस्ती शुल्क –
✔ पहिली Correction – Rs,200/-
✔ दुसरी Correction – Rs.500/-
ही Correction Fee सर्व उमेदवारांसाठी लागू आहे.
वयोमर्यादा (Age Limit):
वयाची गणना 01 ऑगस्ट 2026 रोजी केली जाईल.
18 वर्षे ते 27 वर्षे ((जन्मतारीख 02-08-1999 ते 01-08-2008 दरम्यान असावी))

(SC/ST – +5 वर्ष सूट, OBC: +3 वर्ष सूट, PwBD: +10 वर्ष सूट, ESM: नियमानुसार)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ LDC / JSA – Rs.19,900/- ते Rs.63,200/- (Pay Level-2)
✔ Data Entry Operator (DEO) – Rs.25,500/- ते Rs.81,100/- (Pay Level-4) आणि Rs.29,200/- ते Rs.92,300/- (Pay Level-5)
Data Entry Operator (DEO) Grade ‘A’ – Rs.25,500/- ते Rs.81,100/- (Pay Level-4)

👉याशिवाय केंद्र सरकारच्या नियमानुसार लागू असलेले विविध भत्ते व इतर लाभ मिळतील
.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Tier-I – संगणक आधारित परीक्षा (Objective Type, Multiple Choice Questions)
Tier-II – संगणक आधारित परीक्षा (4 विभाग: Section-I, II, III, IV — दोन सत्रांत)
✔Skill Test / Typing Test – DEO पदासाठी Skill Test अनिवार्य; इतर पदांसाठी Typing Test अनिवार्य
Document Verification (कागदपत्र पडताळणी)
अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) Tier-II मधील Section-I व Section-II च्या गुणांवर आधारित तयार होईल (Section-III व IV फक्त पात्रता स्वरूपाचे आहेत)

किमान पात्रता गुण: खुला प्रवर्ग – 30%, OBC/EWS – 25%, इतर सर्व प्रवर्ग – 20%
शैक्षणिक पात्रता (Qualification):
LDC/JSA आणि DEO/DEO Grade ‘A’ (सर्वसाधारण): मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण (10+2) किंवा समकक्ष.
DEO पद (Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution, SSC व Ministry of Culture साठी): गणित विषयासह विज्ञान शाखेत १२वी उत्तीर्ण.

ज्यांचा १२वीचा निकाल कट-ऑफ तारखेपूर्वी (07-10-2026) लागलेला आहे किंवा परीक्षेस बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र कट-ऑफ तारखेपर्यंत पात्रता पूर्ण असणे आवश्यक.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम SSC च्या अधिकृत नवीन वेबसाईटला भेट द्या: https://ssc.gov.in
  • नवीन वापरकर्त्यांनी प्रथम One Time Registration (OTR) प्रक्रिया पूर्ण करा (जुन्या ssc.nic.in वरील OTR नवीन वेबसाईटवर चालणार नाही)
  • OTR पूर्ण झाल्यावर लॉगिन करून “CHSL Examination 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती भरा.
  • लाईव्ह कॅमेराद्वारे फोटो कॅप्चर करा व स्वाक्षरी (JPEG, 10-20 KB) अपलोड करा.
  • लागू असल्यास परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने (UPI/नेट बँकिंग/डेबिट कार्ड) भरा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी Preview/Print पर्यायाद्वारे भरलेली माहिती पुन्हा तपासा.
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)

SSC CHSL 2026 परीक्षा दोन टप्प्यांमध्ये म्हणजेच Tier-I आणि Tier-II मध्ये घेण्यात येणार आहे. दोन्ही टप्पे Computer Based Examination (CBE) स्वरूपात असतील.

1. Tier-I परीक्षा

भागविषयप्रश्नएकूण गुणवेळ
Part-IEnglish Language (Basic Knowledge)255060 मिनिटे
Part-IIGeneral Intelligence2550
Part-IIIQuantitative Aptitude (Basic Arithmetic Skill)2550
Part-IVGeneral Awareness2550
एकूण10020060 मिनिटे

महत्त्वाचे: Tier-I मध्ये Objective Type / Multiple Choice Questions असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुणांची Negative Marking असेल.

2. Tier-II परीक्षा

Tier-II परीक्षा दोन Sessions मध्ये, त्याच दिवशी घेण्यात येईल.

Session-I

Sectionविषयप्रश्नगुणवेळ
Section-I A. Mathematical Abilities
B. Reasoning and General Intelligence
30 + 30 = 601801 तास
Section-II A. English Language and Comprehension
B. General Awareness
40 + 20 = 601801 तास
Section-IIIComputer Knowledge Test154515 मिनिटे

Session-I ची एकूण वेळ: 2 तास 15 मिनिटे

Session-II

Sectionपरीक्षावेळ
Section-IV – Part ADEO / DEO Grade ‘A’ Skill Test – संबंधित विभाग/मंत्रालय15 मिनिटे
Section-IV – Part Bइतर DEO / DEO Grade ‘A’ Skill Test15 मिनिटे
Section-IV – Part CLDC / JSA Typing Test10 मिनिटे

Tier-II मधील महत्त्वाचे नियम

  • Tier-II मधील सर्व Sections मध्ये पात्र ठरणे अनिवार्य आहे.
  • Section-I, Section-II आणि Section-III मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुणांची Negative Marking आहे.
  • Section-III म्हणजेच Computer Knowledge Test अनिवार्य असून तो Qualifying Nature चा आहे.
  • Section-IV म्हणजेच Skill Test / Typing Test देखील Qualifying Nature चा आहे.
  • DEO पदासाठी Skill Test देणे अनिवार्य आहे.
  • LDC/JSA पदासाठी Typing Test घेण्यात येईल.

DEO Skill Test

प्रकारTyping / Data Entry Speedकालावधी
Part A – विशिष्ट विभाग/मंत्रालयातील DEO / DEO Grade ‘A’15,000 Key Depressions प्रति तास15 मिनिटे
Part B – इतर DEO / DEO Grade ‘A’8,000 Key Depressions प्रति तास15 मिनिटे

LDC / JSA Typing Test

Typing MediumTyping Speedसमान Key Depressionsकालावधी
English35 शब्द प्रति मिनिटसुमारे 10,500 KDPH10 मिनिटे
Hindi30 शब्द प्रति मिनिटसुमारे 9,000 KDPH10 मिनिटे

Note : Typing Test साठी उमेदवाराला Hindi किंवा English यापैकी एक माध्यम निवडावे लागेल. Online Application Form मध्ये केलेली निवड अंतिम असेल.

Negative Marking: Tier-I मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातील, तर Tier-II मधील Section-I, Section-II आणि Section-III मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. SSC CHSL भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू आहेत?

👉SSC CHSL 2026 साठी ऑनलाईन अर्ज 07 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाले असून 07 ऑक्टोबर 2026 पर्यंत करता येतील.

Q2. SSC CHSL 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉 सध्या अंदाजे 2536 जागा जाहीर करण्यात आल्या असून अंतिम पदसंख्या नंतर वेबसाईटवर अद्ययावत केली जाईल.

Q3. SSC CHSL 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण; काही DEO पदांसाठी गणितासह विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण आवश्यक आहे.

Q4. SSC CHSL 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

👉उमेदवाराचे वय 01-08-2026 रोजी 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे; आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार सूट आहे.

Q5. SSC CHSL 2026 परीक्षा शुल्क किती आहे?

👉सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹100/- शुल्क आहे; महिला, SC, ST, PwBD व ESM उमेदवारांना फी माफ आहे.

Q6. SSC CHSL 2026 निवड प्रक्रिया कशी आहे?

👉Tier-I व Tier-II या दोन संगणक आधारित परीक्षा, त्यानंतर Skill/Typing Test आणि कागदपत्र पडताळणीद्वारे अंतिम निवड होते.

Q7. SSC CHSL 2026 अर्ज कुठे करावा?

👉उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in किंवा “my SSC” मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.

    Share this job