Cotton Corporation of India Recruitment 2026 : 148 Assistant Manager, MT, Junior Assistant पदांची भरती | Apply Online

Cotton Corporation of India (CCI) Recruitment 2026 :
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Cotton Corporation of India Ltd – CCI), जी भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, तिने थेट भरती प्रक्रियेद्वारे विविध पदांसाठी नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे (Advt No. DR/CCI/2026, दि. 09/07/2026). या भरतीद्वारे असिस्टंट मॅनेजर (ऑफिशियल लँग्वेज), असिस्टंट मॅनेजर (आयटी), मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग/अकाउंट्स), ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट (जनरल/अकाउंट्स) अशा एकूण 148 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 09 जुलै 2026 ते 24 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.cotcorp.org.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला Cotton Corporation of India (CCI) भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
📍परीक्षा केंद्र (Exam Centres) : Mumbai/Navi Mumbai, Hyderabad, New Delhi, Chennai, Lucknow, Chandigarh, Kolkata, Bengaluru, Ahmedabad, Patna आणि Jaipur.
Cotton Corporation of India (CCI) Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Jalna DCC Bank Recruitment 2026 तसेच HPCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Assistant Manager (Official Language) – 1 Post ✔ Assistant Manager (Information Technology) – 1 Post ✔ Management Trainee (Marketing) – 8 Post ✔ Management Trainee (Accounts) – 8 Post ✔ Junior Commercial Executive – 50 Post ✔ Junior Assistant (Accounts) – 50 Post ✔ Junior Assistant (General) – 30 Post Total Post – 148 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 09 जुलै 2026 ते 24 जुलै 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.1770/- ✔ SC / ST / PwBD / Ex-Servicemen : Rs.590/- Note : वरील शुल्कामध्ये GST समाविष्ट आहे. बँक व्यवहार शुल्क उमेदवाराने स्वतंत्रपणे भरायचे आहे. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ Assistant Manager (Official Language) – 18 वर्षे ते 32 वर्षे ✔ Assistant Manager (Information Technology) – 18 वर्षे ते 32 वर्षे ✔ Management Trainee (Marketing) – 18 वर्षे ते 30 वर्षे ✔ Management Trainee (Accounts) – 18 वर्षे ते 02 वर्षे ✔ Junior Commercial Executive – 18 वर्षे ते 30 वर्षे ✔ Junior Assistant (Accounts) – 18 वर्षे ते 30 वर्षे ✔ Junior Assistant (General) – 18 वर्षे ते 30 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL)– +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Assistant Manager (Official Language/ IT)– Rs.40,000/- ते Rs.1,40,000/- ✔ Management Trainee (Marketing/ Accounts)– Rs.30,000/- ते Rs.1,20,000/- ✔ Junior Commercial Executive – Rs.22,000/- ते Rs.90,000/- ✔ Junior Assistant (Accounts/ General) – Rs.22,000/- ते Rs.90,000/- Note : वेतन IDA Pay Scale प्रमाणे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचा प्रोबेशन कालावधी आणि 3 वर्षांचा सर्व्हिस बाँड लागू राहील. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत Note : मुख्यालय नवी मुंबई येथे असून CCI च्या देशभरातील शाखांमध्ये नियुक्ती केली जाऊ शकते. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ ऑनलाईन संगणकीय चाचणी (CBT) : 120 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, 120 मिनिटांचा कालावधी. प्रत्येक बरोबर उत्तरास 1 गुण व चुकीच्या उत्तरास 0.25 गुण वजा. ✔ कागदपत्र पडताळणी ✔ वैद्यकीय तपासणी किमान पात्रता गुण : UR/EWS/OBC – 40%, SC/ST/PwBD/माजी सैनिक – 35% |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ असिस्टंट मॅनेजर (ऑफिशियल लँग्वेज) : हिंदी विषयात किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, इंग्रजी विषय पदवीपर्यंत असणे आवश्यक. हिंदी भाषांतराची पात्रता असल्यास प्राधान्य. भारत सरकारच्या राजभाषा नियमांचे ज्ञान आवश्यक. MBA असल्यास अतिरिक्त प्राधान्य. तसेच किमान 1 वर्ष अनुभव आवश्यक. ✔ असिस्टंट मॅनेजर (IT) : BE (IT/CS), MCA किंवा MBA/PGDM (IT/System) किमान 50% गुणांसह, ERP चे ज्ञान असल्यास प्राधान्य. किमान 1 वर्ष अनुभव आवश्यक. ✔ मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) : MBA in Agri Business Management किंवा Agriculture संबंधित Management पदवी (MBA समकक्ष). ✔ मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स) : CA/CMA ✔ ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह : B.Sc Agriculture (General साठी 50% गुण, SC/ST/PwBD साठी 45%). ✔ ज्युनियर असिस्टंट (अकाउंट्स): B.Com (General साठी 50% गुण, SC/ST/PwBD साठी 45%). ✔ ज्युनियर असिस्टंट (जनरल): कोणतीही पदवी (General साठी 50% गुण, SC/ST/PwBD साठी 45%). |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट www.cotcorp.org.in वर जा.
- “Recruitment” या लिंकवर क्लिक करा.
- संबंधित पदाची जाहिरात वाचून पात्रता तपासा आणि “Apply Online” वर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता व अनुभव भरा. फोटो, सही, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करून प्रिंटआउट काढून ठेवा.
📌आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज रंगीत फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- 10 वीची गुणपत्रिका / प्रमाणपत्र
- 12 वीची गुणपत्रिका / प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र
- अतिरिक्त पात्रतेचे प्रमाणपत्र (असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. CCI भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?
👉ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 09 जुलै 2026 पासून सुरू होऊन 24 जुलै 2026 पर्यंत चालेल.
Q2. CCI भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 या भरतीत एकूण 148 जागांसाठी भरती होणार आहे.
Q3. CCI भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
👉 सर्वसाधारण/EWS/OBC प्रवर्गासाठी ₹1770 आणि SC/ST/माजी सैनिक/PwBD प्रवर्गासाठी ₹590 इतके शुल्क आहे.
Q4. एका उमेदवाराला किती पदांसाठी अर्ज करता येईल?
👉उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो; एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ते रद्द केले जातील.
Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉ऑनलाईन संगणकीय चाचणी (CBT), त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी निवड प्रक्रिया असेल.
Q6. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
👉उमेदवारांनी www.cotcorp.org.in या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करावा.
Q7. परीक्षा कोणत्या शहरांमध्ये होणार आहे?
👉मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, चंदीगड, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद, पटना आणि जयपूर येथे परीक्षा आयोजित केली जाईल





