Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 : 70 जागांची मेगा भरती | Apply Online

  • July 07, 2026
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 : 70 जागांची मेगा भरती | Apply Online

Jalna DCC Bank Recruitment 2026 :

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जालना यांच्यामार्फत विविध श्रेणीतील रिक्त 70 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीमध्ये उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, बँकिंग ऑफिसर (क्र.1 व क्र.2) आणि कारकुन/लिपिक अशा पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 07 जुलै 2026 ते 18 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://jalnadcc.bank.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला जालना DCC Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Jalna DCC Bank Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी HPCL Officer Recruitment 2026 तसेच IBPS PO/MT Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
उपव्यवस्थापक – 01
✔ सहाय्यक व्यवस्थापक – 01
✔ बँकिंग ऑफिसर क्र.1 – 02

बँकिंग ऑफिसर क्र.2 – 11
✔ कारकुन/लिपिक – 55

Total Post – 70 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
7 जुलै 2026 ते 18 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
खुला (अराखीव) प्रवर्ग – Rs.1000/- (GST सहित)
✔ मागासवर्गीय (राखीव) प्रवर्ग – Rs.800/- (GST सहित)
✔ माजी सैनिक / दिव्यांग – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
उपव्यवस्थापक – 21 ते 45 वर्षे
व्यवस्थापक – 21 ते 40 वर्षे
बँकिंग ऑफिसर क्र.1 – 21 ते 40 वर्षे (राखीव: 45 वर्षे)
बँकिंग ऑफिसर क्र.2 – 21 ते 38 वर्षे (राखीव: 43 वर्षे)
कारकून / लिपिक – 21 ते 38 वर्षे (राखीव: 43 वर्षे)


माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, पदवीधर अंशकालीन व खेळाडू प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
वेतनश्रेणी (Pay Scale):
परिविक्षाधीन कालावधी 3 वर्षांचा राहील. या काळात खालीलप्रमाणे मासिक मानधन दिले जाईल:
बँक ऑफिसर क्र.1 – Rs. 7000/-
बँक ऑफिसर क्र.2 – Rs. 6000/-
कारकुन/लिपिक – Rs. 5000/-

परिविक्षाधीन कालावधी नंतर मानधन खालीलप्रमाणे दिले जाईल:
अंदाजे मासिक वेतन: Rs.30,000/- ते Rs
.1,20,000/- (पदानुसार)

👉 नोट : अधिकृत जाहिरातीत फक्त वेतनश्रेणी (Pay Scale) नमूद करण्यात आली आहे. वरील पगार हा उपलब्ध वेतनश्रेणी व सहकारी बँकांमधील प्रचलित भत्त्यांवर आधारित अंदाज आहे. प्रत्यक्ष वेतन बँकेच्या नियमांनुसार निश्चित केले जाईल.
नोकरी ठिकाण (Job Location):
जालना जिल्ह्यातील बँकेची कोणतीही शाखा
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाइन परीक्षा – IBPS मार्फत घेतली जाईल.
कागदपत्र पडताळणी
वैयक्तिक मुलाखत
अंतिम गुणवत्ता यादी

Note:
✔ उत्तीर्ण होण्यासाठी सर्व पदांसाठी किमान 40% गुण आवश्यक.
✔ चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी 1/4 गुण वजा (Negative Marking) केले जातील.
✔ ऑनलाईन परीक्षेतील गुणानुक्रमे पदसंख्येच्या 1:3 प्रमाणात उमेदवारांची यादी कागदपत्र पडताळणी व मुलाखतीसाठी प्रसिद्ध होईल.
✔ मुलाखत 10 गुणांची राहील.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
उपव्यवस्थापक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर/सनदी लेखापाल/MBA फायनान्स/M.Sc Computer/ME Computer किमान 50% गुणांसह उत्तीर्ण + MS-CIT; बँकिंग क्षेत्रातील उच्च व्यवस्थापन श्रेणीत किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक.

सहाय्यक व्यवस्थापक: वरीलप्रमाणेच शैक्षणिक पात्रता + MS-CIT; बँकिंग क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

बँकिंग ऑफिसर क्र.1: वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर/सनदी लेखापाल/MBA फायनान्स/M.Sc Computer/ME Computer इ. 50% गुणांसह + MS-CIT; बँकिंग क्षेत्रातील मध्य व्यवस्थापन श्रेणीत किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

बँकिंग ऑफिसर क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवीधर/पदव्युत्तर 50% गुणांसह + MS-CIT, (प्राधान्य :- एम.कॉम./
बी.ई.कंप्युटर, बीएससी कंप्युटर,बीसीए तत्सम पदवी / पदवीत्तर); बँकिंग क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव (किंवा लिपिक पदावर 3 वर्षे अनुभव) आवश्यक.


कारकुन/लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर (प्राधान्य :- बी.कॉम./ एम.कॉम./बी.ई.कंप्युटर, बीएससी कंप्युटर,बीसीए तत्सम पदवी / पदवीत्तर) + MS-CIT; बँकिंग सॉफ्टवेअर अनुभव असल्यास प्राधान्य.

सर्व पदांसाठी MS-CIT किंवा तत्सम शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी (3 वर्षे परिविक्षाधीन कालावधीनंतर)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – https://jalnadcc.bank.in
  • “Advertisement” किंवा “ऑनलाईन अर्ज” या लिंकवर क्लिक करा.
  • संबंधित पदासाठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा व पात्रता तपासा.
  • नवीन नोंदणी (Registration) करून वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदवा.
  • ऑनलाईन अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रांनुसार माहिती भरून झाल्यावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा.
  • अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा पीडीएफ प्रत जतन करून ठेवा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 18/07/2026 आहे, त्यापूर्वी अर्ज पूर्ण करा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • स्वयंघोषणापत्र
  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील)
  • महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • दिव्यांग/माजी सैनिक/खेळाडू आरक्षणासाठी संबंधित पुरावा (लागू असल्यास)

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. जालना डीसीसी बँक भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू आहेत?

👉ऑनलाईन अर्ज दिनांक 07/07/2026 पासून सुरू असून अंतिम तारीख 18/07/2026 आहे.

Q2. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 खुल्या प्रवर्गासाठी रु. 1000/- व मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु. 800/- (GST सहित) आहे. माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ आहे.

Q3. उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती गुण आवश्यक आहेत?

👉 सर्व पदांसाठी किमान 40% गुण आवश्यक आहेत.

Q4. निवड प्रक्रिया काय आहे?

👉ऑनलाईन परीक्षा, त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत (10 गुण) याआधारे अंतिम निवड होईल.

Q5. एकाच उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?

👉नाही, उमेदवाराला फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल.

Q6. नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

👉निवड झालेल्या उमेदवारांना जालना जिल्ह्यातील बँकेच्या कोणत्याही शाखेत नियुक्ती दिली जाईल.

    Share this job