Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 5707 पदांची मेगा भरती | Apply Online

  • July 23, 2026
MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 5707 पदांची मेगा भरती | Apply Online

📢 नवीन अपडेट (22 जुलै 2026):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले असून, यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 2619 पदांऐवजी आता एकूण 5707 पदांसाठी भरती होणार आहे. तसेच काही नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे.

MPSC Group C Bharti 2026 :

MPSC Group C Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दिनांक 25 जून 2026 रोजी “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2026” (जाहिरात क्रमांक 017/2026) जाहीर केली असून यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व लिपिक-टंकलेखक अशा एकूण 2619 जागांचा समावेश आहे. दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार परीक्षा आता संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने घेतली जाणार असून पूर्व परीक्षेची तारीख 25 ऑक्टोबर 2026 आणि मुख्य परीक्षेची तारीख 27 डिसेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय दिनांक 22 जुलै 2026 च्या पुढील शुद्धिपत्रकाद्वारे तलाठी, लिपिक-टंकलेखक यांसारख्या आणखी 3088 जागांचा समावेश या परीक्षेत करण्यात आला आहे. सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला MPSC Group C भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

MPSC Group C Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NBEMS Recruitment 2026 तसेच BEML Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
उद्योग निरीक्षक – 9 Post
तांत्रिक सहाय्यक – 3 Post
कर सहाय्यक – 282 Post
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक – 461 Post
लिपिक-टंकलेखक – 1864 Post

Total Post – 2619 Post


तलाठी – 1539 Post
✔ वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक
/ अभिलेखापाल /सहायक अधीक्षक – 22 Post
✔ सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – 254 Post
✔ लिपिक-टंकलेखक (विविध विभाग) – 480 Post

लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) – 339 Post

Total Post – 3088 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
27 जून 2026 ते 5 ऑगस्ट 2026
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 8 ऑगस्ट 2026

पूर्व परीक्षा – 25 ऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षा – 27 डिसेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
संयुक्त पूर्व परीक्षा –
✔ अमागास (खुला) – Rs.394/-
✔ मागासवर्गीय/आ.दु.घ /अनाथ – Rs.294/-
✔ माजी सैनिक (फक्त गट-क संवर्ग) – Rs.44/-


मुख्य परीक्षा –
✔ अमागास (खुला) – Rs.544/-
✔ मागासवर्गीय/आ.दु.घ /अनाथ – Rs.344/-
✔ माजी सैनिक (फक्त गट-क संवर्ग) – Rs.44/-


Note : वरील शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस व GST अतिरिक्त असेल. शुल्क न-परतावा (Non-refundable) आहे.
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा मोजण्याची दिनांक: 1 ऑक्टोबर 2026
कर सहायक (अमागास) : 18 वर्षे ते 38 वर्षे
अमागास : 19 वर्षे ते 38 वर्षे ( कर सहायक वगळता बाकी पदांसाठी )

वयोमर्यादा सवलत – मागासवर्ग : 43 वर्षे, दिव्यांग : 45 वर्षे, माजी सैनिक : नियमानुसार, इतर आरक्षण : शासन नियमानुसार
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
उद्योग निरीक्षक – S-13: Rs.35,400/- ते Rs.1,12,400/-
तांत्रिक सहायक
– S-10: Rs.29,200/- ते Rs.92,300/-
कर सहायक – S-8: Rs.25,500/- ते Rs.81,100/-
लिपिक-टंकलेखक – S-6: Rs.19,900/- ते Rs.63,200/-
सहायक मोटार वाहन निरीक्षक – S-14: Rs.38,600 ते Rs.1,22,800/-

बाकी पदांसाठी – शासन नियमानुसार व सातव्या वेतन आयोगानुसार

👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
संयुक्त पूर्व परीक्षा (100 गुण) (सर्व पदांसाठी)
संयुक्त मुख्य परीक्षा (उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक यांसाठी – 400 गुण)
स्वतंत्र मुख्य परीक्षा (सहायक मोटार वाहन निरीक्षकसाठी – 300 गुण)
✔ कागदपत्र पडताळणी व अंतिम निवड यादी
शैक्षणिक पात्रता (Qualification):
उद्योग निरीक्षक –
– अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदविका (स्थापत्य/वास्तुविद्या/नगररचना वगळून) किंवा विज्ञान शाखेतील पदवी


✔ तांत्रिक सहाय्यक –
– कोणत्याही शाखेतील पदवी


✔ कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक –
– कोणत्याही शाखेतील पदवी.
– मराठी टंकलेखन 30 शब्द/मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द/मिनिट प्रमाणपत्र.


✔ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक –
– SSC उत्तीर्ण.
– Automobile Engineering / Mechanical Engineering मधील पदविका किंवा पदवी.
– वैध Driving License (जड वाहन चालविण्याची पात्रता जाहिरातीनुसार).
– संबंधित अनुभव.
– शारीरिक पात्रता आवश्यक.


ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल, सहायक अधीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी

✔ सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) – मत्स्यविज्ञान विषयातील B.F.Sc. किमान द्वितीय श्रेणीतील पदवी आवश्यक


लिपिक-टंकलेखक (विविध विभाग / नोंदणी व मुद्रांक विभाग) – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 शब्द/मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द/मिनिट प्रमाणपत्र.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)Corrigendum-1
Corrigendum-2
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • नवीन उमेदवार असल्यास Profile (खाते) तयार करा.
  • KYC प्रक्रिया पूर्ण करा.
  • “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026” या जाहिरातीवर क्लिक करा.
  • आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (लागू असल्यास) PDF स्वरूपात अपलोड करा.
  • ऑनलाईन पद्धतीने (Debit/Credit Card/Net Banking) किंवा चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरा.
  • अर्ज Submit करून प्रिंटआऊट काढून ठेवा.
  • अर्ज 31 जुलै 2026 पूर्वी व शुल्क 3 ऑगस्ट 2026 पूर्वी भरणे बंधनकारक आहे

📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)


MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे.

ही परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाऊ शकते. प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल.

सर्व सत्रांतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व कठीणता स्तर विचारात घेऊन परीक्षेअंती गुणांचे समानीकरण (Normalization) केले जाईल. त्यानुसार Normalized गुण निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल.


अ.क्र.संवर्गपूर्व परीक्षेचे टप्पेमुख्य परीक्षेचे टप्पेसंयुक्त पूर्व परीक्षेचे गुणमुख्य परीक्षेचे गुण
1उद्योग निरीक्षकसंयुक्त पूर्व परीक्षासंयुक्त मुख्य परीक्षा100400
2तांत्रिक सहायक, विमा संचालनालय
3कर सहायक
4लिपिक-टंकलेखक
5सहायक मोटार वाहन निरीक्षकसंयुक्त पूर्व परीक्षास्वतंत्र मुख्य परीक्षा300

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉मूळ जाहिरातीनुसार 2619 जागा असून, त्यानंतरच्या शुद्धिपत्रकाद्वारे आणखी 3088 जागांचा समावेश करण्यात आला आहे.

Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 (रात्री 23:59) आहे, तर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2026 आहे.

Q3. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा कधी होणार?

👉 पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी, तर मुख्य परीक्षा 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे.

Q4. या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा?

👉mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

Q.5 या भरतीसाठी कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?

👉उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, तलाठी, वरिष्ठ अभिलेखापाल/सहायक अधीक्षक, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आणि लिपिक-टंकलेखक ही पदे उपलब्ध आहेत.

Q.6 सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

👉S.S.C. उत्तीर्ण आणि ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील किमान 3 वर्षांची पदविका आवश्यक आहे.

Q.7 कमाल वयोमर्यादा किती आहे?

👉सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वय 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे आहे (1 ऑक्टोबर 2026 रोजी).

Q.8 परीक्षा CBT (ऑनलाइन) आहे की ऑफलाइन?

👉सुरुवातीला CBT जाहीर केले होते, पण शुद्धिपत्रकानुसार आता परीक्षा ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने घेतली जाणार आहे.

    Share this job