Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Punjab National Bank LBO Recruitment 2026 : 545 जागांसाठी भरती | Apply Online

  • July 21, 2026
Punjab National Bank LBO Recruitment 2026 : 545 जागांसाठी भरती | Apply Online

PNB LBO Recruitment 2026 :

Punjab National Bank (PNB) मार्फत Local Bank Officer (LBO) (JMGS-I) पदांच्या 545 रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये ही भरती होणार असून महाराष्ट्रासाठी 67 जागा राखीव आहेत. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 20 जुलै 2026 ते 09 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://pnb.bank.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला PNB LBO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📍महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे : मुंबई/नवी मुंबई/ठाणे/MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, नांदेड, अमरावती आणि धुळे.

PNB LBO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Thane Mahanagarpalika Fireman Bharti 2026 तसेच WCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Local Bank Officer (LBO) – 545 Post
महाराष्ट्र : 67 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
20 जुलै 2026 ते 09 ऑगस्ट 2026

ऑनलाइन परीक्षा : ऑगस्ट / सप्टेंबर 2026 (tentative)
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs.1180/-
SC / ST / PwBD : Rs.59/-
वयोमर्यादा (Age Limit):
(01 जुलै 2026 रोजी )
20 वर्षे ते 30 वर्षे
(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार, 1984 Riot Victims : 5 वर्षे)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.48,480/- ते Rs.85,920/-

👉याशिवाय DA, Special Allowance, HRA/Lease, Medical, LFC व इतर बँक भत्ते लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत (उमेदवाराने ज्या राज्यासाठी अर्ज केला असेल त्या राज्यात नियुक्ती दिली जाईल).
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
Online Written Test
Screening — कागदपत्रांची पडताळणी.
✔ Local Language Proficiency Test – LLPT — जे उमेदवार 10वी/12वीमध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेले नाहीत, त्यांना ही चाचणी द्यावी लागेल.
✔ Personal Interview) — 50 गुणांची मुलाखत; उत्तीर्ण होण्यासाठी SC/ST साठी 45% व इतरांसाठी 50% गुण आवश्यक.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर + किमान 1 वर्ष Clerical/ Officer Cadre मधील बँकिंग अनुभव आवश्यक (Scheduled Commercial Bank किंवा Regional Rural Bank (RRB)मध्ये)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://pnb.bank.in/
  • “Recruitment/Careers” या विभागात जाऊन “PNB Local Bank Officer Recruitment 2026” या जाहिरातीची लिंक शोधा.
  • “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करा.
  • मिळालेल्या Provisional Registration Number आणि Password नीट जतन करून ठेवा.
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून दिलेल्या निकषांनुसार अपलोड करा.
  • शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा.
  • लागू असलेले अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट काढून ठेवा.

Note : अर्ज सादर केल्यानंतर राज्य, प्रवर्ग किंवा इतर तपशिलात कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे अर्ज भरताना अत्यंत काळजी घ्यावी.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / इतर फोटो ओळखपत्र
  • 10वीचे प्रमाणपत्र
  • 12वीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • अनुभव प्रमाणपत्र (किमान 1 वर्ष)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • हस्तलिखित घोषणा (Handwritten Declaration)
  • इतर आवश्यक कागदपत्रे.

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)-

विषयप्रश्नगुणवेळ
Reasoning & Computer Aptitude252535 मिनिटे
Data Analysis & Interpretation252535 मिनिटे
English Language252525 मिनिटे
Quantitative Aptitude252535 मिनिटे
General / Economy / Banking Awareness505050 मिनिटे
एकूण150150180 मिनिटे (3 तास)

महत्त्वाच्या सूचना –

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल.
  • General/EWS उमेदवारांना प्रत्येक विभागात किमान 40% गुण आवश्यक आहेत.
  • SC/ST/OBC/PwBD इत्यादी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना प्रत्येक विभागात किमान 35% गुण आवश्यक आहेत.
  • बँकेला किमान पात्रता गुणांमध्ये बदल करण्याचा अधिकार राखीव आहे.

Final Selection –

अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) ही Online Written Test + Personal Interview मधील गुणांच्या आधारे तयार केली जाईल. ज्या उमेदवारांना LLPT लागू असेल त्यांनी तो पात्र (Qualify) करणे अनिवार्य आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1.PNB Local Bank Officer भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉पंजाब नॅशनल बँकेने Local Bank Officer (LBO) पदासाठी एकूण 545 जागा जाहीर केल्या आहेत.

Q2.PNB Local Bank Officer पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?

👉 उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

Q3. PNB LBO पदासाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे व कमाल 30 वर्षे असावे (01.07.2026 रोजी), आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयात सूट दिली जाईल.

Q4. या पदासाठी अनुभव आवश्यक आहे का?

👉होय, उमेदवाराला कोणत्याही अनुसूचित वाणिज्य बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत क्लेरिकल/ऑफिसर कॅडरमध्ये किमान 1 वर्षाचा पदव्युत्तर कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी (लागू असल्यास) आणि व्यक्तिगत मुलाखत या 4 टप्प्यांत होईल.

Q6. उमेदवार एकापेक्षा जास्त राज्यांसाठी अर्ज करू शकतो का?

👉नाही, उमेदवाराला फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करता येईल, आणि एकदा अर्ज सादर केल्यानंतर राज्य बदलता येणार नाही.

Q7. अर्ज ऑनलाईन कुठे करावा लागेल?

👉उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईट https://pnb.bank.in/ वरून Recruitment/Careers विभागात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

Q8. निवड झालेल्या उमेदवाराला किती वर्षे बँकेत सेवा द्यावी लागेल?

👉निवड झालेल्या उमेदवाराला किमान 3 वर्षे सेवा देण्याचे इंडेम्निटी बॉन्ड लिहून द्यावे लागेल, अन्यथा ₹2,00,000/- रक्कम बँकेला भरावी लागेल.

    Share this job