Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Sindhudurg DCC Bank Bharti 2026 : क्लर्क पदाच्या 67 जागांसाठी भरती | Apply Online

  • September 04, 2026
Sindhudurg DCC Bank Bharti 2026 : क्लर्क पदाच्या 67 जागांसाठी भरती | Apply Online

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग (Sindhudurg DCC Bank) यांच्यामार्फत क्लर्क पदाच्या एकूण 67 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सन 1983 मध्ये स्थापन झालेल्या या बँकेचे सिंधुदुर्गनगरी येथे मुख्य कार्यालय असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात 98 शाखांमार्फत बँकेचे कामकाज चालते. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज प्रक्रिया 03 सप्टेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर sindhudurgdcc.bank.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Sindhudurg DCC Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS RRB Recruitment 2026 तसेच SBI Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Clerk (लिपिक) – 67 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
03 सप्टेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ सर्व प्रवर्गासाठी – Rs.763/- + 18% GST = Rs.900/- (ऑफलाईन पेमेंट – NEFT/IMPS/Account Transfer)
वयोमर्यादा (Age Limit):
वयाची गणना 31 ऑगस्ट 2026 रोजी केली जाईल.
21 वर्षे ते 40 वर्षे

✔ उमेदवाराचा जन्म:
01 सप्टेंबर 1986 पूर्वीचा नसावा

31 ऑगस्ट 2005 नंतरचा नसावा
वेतनश्रेणी (Pay Scale):
लिपिक पदावर सुरुवातीला 18 महिन्यांचा Probation कालावधी असेल.
Probation दरम्यान स्टायपेंड : Rs.18,000/- प्रतिमहिना


👉 18 महिन्यांचा Probation कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवाराची Regular Clerk Grade मध्ये नियुक्ती केली जाईल आणि बँकेच्या Clerk Pay Scale नुसार एकूण वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण (Job Location):
सिंधुदुर्ग जिल्हा
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाइन परीक्षा
✔ वैयक्तिक मुलाखत
✔ अंतिम गुणवत्ता यादी


ऑनलाइन परीक्षेत उमेदवारांना किमान 50% म्हणजे 45 गुण मिळवणे आवश्यक असून हे Cut-off म्हणून नमूद केले आहे. बँकेला Cut-off वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणत्याही शाखेतील Graduate / Post-Graduate पदवी (किमान 40% गुण)
✔ उमेदवाराने Matriculation परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
✔ खालील अभ्यासक्रमातील पदवी/पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल:
B.Com , B.A., B.Sc. (IT / Agriculture / Mathematics / Statistics), Computer & IT संबंधित Degree / Post-Graduate Degree, B.C.A. किंवा इतर समकक्ष Computer & IT संबंधित पात्रता
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम सिंधुदुर्ग DCC बँकेच्या अधिकृत वेबसाईट sindhudurgdcc.bank.in/recruitment2026 वर भेट द्या.
  • “Clerk Recruitment 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, 10वी, 12वी, पदवी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र) स्कॅन करून तयार ठेवा.
  • नवीन नोंदणी (Registration) करून वैयक्तिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे विहित आकारात अपलोड करा.
  • परीक्षा शुल्क NEFT/IMPS द्वारे भरून Transaction ID अर्जात नोंदवा व पावती अपलोड करा.
  • अर्ज पूर्णपणे तपासून सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • Colour Photograph
  • Signature
  • 10वी प्रमाणपत्र
  • 12वी प्रमाणपत्र
  • Graduate Certificate
  • Post Graduate Certificate, लागू असल्यास
  • Domicile Certificate
  • परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)

सिंधुदुर्ग DCC बँक लिपिक भरती 2026 अंतर्गत उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल.

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप

अ.क्र.विषयप्रश्नसंख्यागुण
1Agriculture Credit Supply and Three-Tier Structure3535
2Banking and Co-operation3030
3Agriculture and Rural Economy1010
4General Knowledge and Current Affairs55
5Computer and Information Technology55
6Intelligence Test55
एकूण9090

परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती

  • एकूण प्रश्न: 90
  • एकूण गुण: 90
  • परीक्षेचा कालावधी: 75 मिनिटे
  • परीक्षेची भाषा: मराठी आणि इंग्रजी
  • उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी किमान 50% म्हणजे 45 गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • आवश्यकतेनुसार Cut-off गुण वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार बँकेकडे राहील.

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा → वैयक्तिक मुलाखत → अंतिम गुणवत्ता यादी

ऑनलाईन परीक्षेतील कामगिरीच्या आधारे पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी Shortlist केले जाईल. अंतिम गुणवत्ता यादी ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Sindhudurg DCC Bank Bharti 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू आहे?

👉03 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येईल.

Q2. या भरतीत किती जागा आहेत?

👉 क्लर्क पदाच्या एकूण 67 जागा भरण्यात येणार आहेत.

Q3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे व कमाल 40 वर्षे (दि. 31/08/2026 रोजी) असावे.

Q4. परीक्षा शुल्क किती आहे?

👉सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. 900/- (रु. 763 + 18% GST) आहे, जे ऑफलाईन पद्धतीने भरावे लागेल.

Q5. शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर/पदव्युत्तर (किमान 40% गुणांसह) असावा आणि मराठी विषयासह मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q6. निवड झाल्यास वेतन किती मिळेल?

👉निवड झालेल्या उमेदवारास 18 महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीत दरमहा रु. 18,000/- स्टायपेंड मिळेल, त्यानंतर नियमित क्लर्क वेतनश्रेणी लागू होईल.

Q7. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

Q8. ही भरती कोणासाठी आहे?

👉ही भरती फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांसाठी आहे.

    Share this job