India Post GDS Recruitment 2026 : 23,757 Post | 10वी पास उमेदवारांसाठी BPM, ABPM आणि Dak Sevak भरती | Apply Online

🔴 महत्त्वाचे अपडेट: 01 सप्टेंबर 2026: India Post GDS Bharti 2026 साठी नवीन Annexure-Ia प्रसिद्ध झाले असून आता देशभरातील 23,757 रिक्त पदांची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी Marathi भाषेतील 2,297 पदे उपलब्ध आहेत.
India Post GDS Recruitment 2026 :
भारतीय टपाल विभागाने (Department of Posts) Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-II, July-2026 अंतर्गत नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध सर्कल आणि विभागांमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिसूचना क्रमांक 17-12/2026-GDS असून ती दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असून, संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुक व पात्र पात्र उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 या कालावधीत indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला India Post GDS भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
India Post GDS Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Bank of Baroda LBO Recruitment 2026 तसेच HAL Nashik Apprentice Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Branch Postmaster (BPM) ✔ Assistant Branch Postmaster (ABPM) ✔ Dak Sevak Total – 23,757 Post Maharashtra Circle: 2,431 Post (2,297 Post Marathi + 134 Post Konkani/Marathi) |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| One-Time Registration – 31 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026 ऑनलाइन अर्ज – 2 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 Application Correction Window: 23 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ सर्व उमेदवार – Rs.100/- ✔ महिला, SC/ST, PwBD व ट्रान्सवुमन उमेदवार – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 वर्षे ते 40 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट, EWS: सूट नाही, PwBD: 10 वर्षे सूट) वयाची गणना ऑनलाइन अर्जाच्या अंतिम तारखेप्रमाणे केली जाईल. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ BPM – Rs.12,000/- ते Rs.29,380/- ✔ ABPM/Dak Sevak – Rs.10,000/- ते Rs.24,470/- याशिवाय TRCA मध्ये नियमांनुसार दरवर्षी 3% वाढ, तसेच Dearness Allowance आणि काही इतर भत्ते व सामाजिक सुरक्षा लाभ लागू आहेत. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ संपूर्ण भारतातील विविध Postal Circle, Division आणि पोस्ट ऑफिसमध्ये. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल. ✓ 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट ✓ कागदपत्र पडताळणी |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. ✓ 10वीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक. ✓ संबंधित स्थानिक भाषा किमान 10वीपर्यंत शिकलेली असावी. ✓ महाराष्ट्रातील पदांसाठी स्थानिक भाषा मराठी आहे. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| ✓ GDS Engagement / Civil Post; नियमित केंद्र सरकारी कर्मचारी पद नाही. |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) Annexure-Ia | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Application Form | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम अधिकृत पोर्टल indiapost.gov.in/gdsonlineengagement वर जा.
- “New Candidate Registration” वर क्लिक करून मोबाईल नंबर व ईमेल आयडी OTP द्वारे व्हेरिफाय करून वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) पूर्ण करा.
- रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड मिळाल्यानंतर लॉगिन करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरा.
- आपल्या स्थानिक भाषेनुसार उपलब्ध सर्कल/विभाग निवडून पदांचे प्राधान्यक्रम (Preferences) द्या.
- विहित मापाचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करा (JPG/JPEG फॉरमॅट).
- अर्जाचे Preview तपासून, आवश्यक असल्यास ₹100 शुल्क ऑनलाईन भरा.
- अर्ज अंतिम सबमिट करून प्रिंटआऊट काढून ठेवा.
📌आवश्यक कागदपत्रे
- 10वी ची Marksheet
- Identity Proof
- Caste Certificate
- PwBD Certificate
- EWS Certificate
- Transgender Certificate
- Date of Birth Proof
- Government Hospital/Dispensary/PHC मधील Medical Certificate – अनिवार्य
- आवश्यक असल्यास स्थानिक भाषा/Tribal Language Certificate
Shortlist झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत Document Verification साठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. वेळेत उपस्थित न राहिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. India Post GDS भरती 2026 साठी अर्ज कुठे करावा?
👉 उमेदवारांनी indiapost.gov.in/gdsonlineengagement या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Q2. GDS भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 मान्यताप्राप्त बोर्डाची 10वी (SSE) परीक्षा गणित व इंग्रजी विषयात उत्तीर्ण गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच संबंधित राज्याची स्थानिक भाषा 10वीपर्यंत अभ्यासलेली असावी.
Q3. GDS भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
👉 किमान वय 18 वर्षे व कमाल वय 40 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयात सूट दिली जाते.
Q4.GDS पदासाठी लेखी परीक्षा असते का?
👉 नाही. निवड ही केवळ उमेदवाराच्या 10वीच्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित सिस्टीम जनरेटेड गुणवत्ता यादीनुसार केली जाते.
Q5. अर्ज शुल्क किती आहे व कोणाला माफ आहे?
👉 सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹100 शुल्क आहे. महिला, SC/ST, PwBD आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
Q6. GDS कर्मचाऱ्यांना किती वेतन मिळते?
👉 BPM पदासाठी ₹12,000 ते ₹29,380 आणि ABPM/Dak Sevak पदासाठी ₹10,000 ते ₹24,470 इतके Time Related Continuity Allowance (TRCA) दिले जाते, यासोबत महागाई भत्ता (DA) देखील मिळतो.
Q7. अर्ज सादर केल्यानंतर दुरुस्ती करता येते का?
👉होय, अंतिम तारखेनंतर 2 दिवसांची (23.09.2026 ते 24.09.2026) दुरुस्ती विंडो दिली जाते, ज्यामध्ये मोबाईल नंबर व ईमेल आयडी वगळता इतर तपशील दुरुस्त करता येतात.
Q8. GDS ही केंद्र सरकारची नियमित नोकरी आहे का?
👉नाही. GDS कर्मचारी हे केंद्र सरकारचे नियमित कर्मचारी नसून ते GDS (Conduct and Engagement) Rules, 2020 नुसार वेगळ्या सेवाशर्तींखाली काम करतात.





