Bank of Baroda (BOB) Recruitment 2026 : बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांची भरती | Apply Online

BOB Recruitment 2026 :
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ही भारतातील एक आघाडीची सरकारी बँक असून, बँकेने नुकतीच Wealth Executive आणि Credit Analyst – C&IC या पदांसाठी नियमित (Regular) पद्धतीने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1100 जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये Wealth Executive पदासाठी 1000 जागा तर Credit Analyst पदासाठी 100 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 04 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.bank.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला Bank of Baroda भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
👉 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR, अमरावती, नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, लातूर आणि सोलापूर
अंतिम परीक्षा केंद्र उमेदवारांना Call Letter द्वारे कळवले जाईल. तसेच अर्जांची संख्या व प्रशासकीय सोय यानुसार Bank परीक्षा केंद्रांमध्ये बदल, भर किंवा कपात करू शकते.
BOB Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 तसेच SSC JE Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Wealth Executive (JMG/S-I) – 1000 Post ✔ Credit Analyst – C&IC (MMG/S-II) – 100 Post Total – 1100 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 04 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.850/- + Payment Gateway Charges ✔ SC /ST /PwBD /ESM / महिला : Rs.175/- + Payment Gateway Charges |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2026 रोजी) ✔ Wealth Executive: 22 वर्षे ते 32 वर्षे ✔ Credit Analyst – C&IC: 21 वर्षे ते 33 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Wealth Executive (JMG/S-I) – Rs.48,480/- ते Rs.85,920/- ✔ Credit Analyst – C&IC (MMG/S-II) – Rs.64,820/- ते Rs.93,960/- 👉 याशिवाय Bank च्या नियमांनुसार allowances, benefits, perquisites इत्यादी लागू होऊ शकतात. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Application Scrutiny ✔ Online Test – लागू असल्यास ✔ Psychometric Test – लागू असल्यास ✔ Group Discussion – लागू असल्यास ✔ Personal Interview / Multiple Interviews ✔ Final Selection / Allotment |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Wealth Executive (JMG/S-I) – कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) + त्यासोबत खालीलपैकी कोणतेही एक वैध प्रमाणपत्र आवश्यक: IC 38 (Insurance Institute of India), NISM Series V-A (Mutual Fund Distributors), NISM Series XXI-A (PMS Distributors) किंवा NISM Series V-D (Mutual Fund – Specialised Investment Fund Distributors). प्राधान्य पात्रता: 2 वर्षांची पूर्णवेळ Post Graduate Degree/Diploma in Management किंवा MBA (Finance/Marketing/Banking). अनुभव: भारतातील अग्रगण्य Public Sector Bank / Private Sector Bank / Foreign Bank / Broking / Securities Firm / Asset Management Company / Wealth Management Company मध्ये Wealth Products च्या Sales चा किमान 2 वर्षांचा अनुभव. ✔ Credit Analyst – C&IC (MMG/S-II) – कोणत्याही शाखेतील पदवी + Chartered Accountant (CA) अनिवार्य अनुभव: Scheduled Commercial Bank मध्ये किमान 1 वर्षाचा Banking Experience Corporate Credit मधील अनुभव Preferred आहे |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- www.bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- Career → Current Opportunities या विभागात जा.
- संबंधित जाहिरातीची लिंक शोधून Apply Online वर क्लिक करा.
- नोंदणीसाठी वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा.
- ऑनलाईन अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती भरा.
- फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
- आवश्यक कागदपत्रे (Resume, DOB Proof, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र इ.) PDF स्वरूपात अपलोड करा.
- प्रवर्गानुसार ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
- अर्जाची प्रिंटआउट काढून जपून ठेवा.
📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)-
Bank of Baroda Recruitment 2026 अंतर्गत Online Test घेण्यात आल्यास PDF मध्ये दिलेली संभाव्य परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे आहे.
| क्र. | विषय | प्रश्नसंख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|---|
| 1 | English Language | 20 | 20 | 20 मिनिटे |
| 2 | Reasoning Ability & Quantitative Aptitude | 20 | 20 | 20 मिनिटे |
| 3 | General / Economic & Banking Awareness | 20 | 20 | 20 मिनिटे |
| 4 | Professional Knowledge related to the Position | 60 | 60 | 60 मिनिटे |
| एकूण | 120 | 120 | 120 मिनिटे | |
परीक्षेबाबत महत्त्वाचे मुद्दे
- Online Test घेतल्यास एकूण 120 प्रश्न असतील.
- परीक्षेचे एकूण 120 गुण असतील.
- परीक्षेचा एकूण कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
- English Language वगळता इतर Sections English आणि Hindi भाषेत उपलब्ध असतील.
- English Language, Reasoning Ability & Quantitative Aptitude आणि General / Economic & Banking Awareness हे Sections qualifying nature चे आहेत.
- या पहिल्या तीन Sections मधील गुण Merit List किंवा Final Result साठी मोजले जाणार नाहीत.
- प्रत्येक Section मध्ये किमान qualifying marks/percentage Bank आपल्या निर्णयानुसार ठरवू शकते.
- चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या निर्धारित गुणांच्या 0.25 गुणांची negative marking असेल.
- प्रश्न अनुत्तरित ठेवल्यास त्यासाठी कोणतीही penalty नाही.
- Bank गरजेनुसार परीक्षेची रचना बदलू शकते किंवा अतिरिक्त परीक्षा/Descriptive Test/Case Study समाविष्ट करू शकते.
- Online Test ची तारीख असल्यास ती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.
निवड प्रक्रिया
पदासाठी लागू असलेल्या निवड प्रक्रियेनुसार Application Scrutiny, Online Test, Psychometric Test, Group Discussion आणि/किंवा Personal Interview यांचा समावेश होऊ शकतो.
Online Test घेतल्यास उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी निवड ही Online Test मधील कामगिरी, पात्रता, संबंधित अनुभव, Domain Expertise, Skill Set, Suitability आणि Bank ने निश्चित केलेल्या इतर निकषांच्या आधारे केली जाऊ शकते.
Note : PDF नुसार वरील Online Test Structure ही tentative आहे. Bank ला परीक्षेची रचना आणि निवड प्रक्रिया बदलण्याचा अधिकार आहे.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. Bank of Baroda भरती 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?
👉या भरतीअंतर्गत एकूण 1100 जागा आहेत – Wealth Executive साठी 1000 आणि Credit Analyst – C&IC साठी 100 जागा.
Q2. Bank of Baroda Bharti 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची व शुल्क भरण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2026 आहे.
Q3. Wealth Executive पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
👉 कोणत्याही शाखेतील पदवी सोबत IC 38, NISM Series V A, NISM Series XXI-A किंवा NISM Series V-D यापैकी कोणतेही एक वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Q4. Credit Analyst – C&IC पदासाठी पात्रता काय आहे?
👉कोणत्याही शाखेतील पदवी सोबत Chartered Accountant (CA) पात्रता आवश्यक आहे, तसेच किमान 1 वर्ष Scheduled Commercial Bank मध्ये बँकिंग अनुभव आवश्यक आहे.
Q5. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
👉General/EWS/OBC प्रवर्गासाठी ₹850/- आणि SC/ST/PWBD/ESM/महिलांसाठी ₹175/- (GST व Payment Gateway Charges सह) शुल्क आहे.
Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाळणी परीक्षा (लागू असल्यास), Group Discussion/Psychometric Test आणि Personal Interview यांचा समावेश असेल.
Q7. वयोमर्यादा किती आहे?
👉Wealth Executive पदासाठी 22 ते 32 वर्षे तर Credit Analyst पदासाठी 21 ते 33 वर्षे वयोमर्यादा आहे (01.09.2026 रोजी), आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार सूट लागू आहे.
Q8. निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण कोणते असेल?
👉निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या निर्णयानुसार भारतातील कोणत्याही शाखेत/कार्यालयात नियुक्ती दिली जाऊ शकते. फक्त भारतात कुठेही सेवा देण्यास तयार असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावा.
Q9. अर्ज ऑनलाईन कुठे करायचा आहे?
👉उमेदवारांनी www.bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाईटवर Career → Current Opportunities या विभागातून ऑनलाईन अर्ज करावा.
Q10. निवड झाल्यास किती कालावधीचा प्रोबेशन असेल?
👉निवड झालेल्या उमेदवारास बँकेत रुजू झाल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांचा (1 वर्ष) प्रोबेशन कालावधी असेल.





