Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2026 : 750 जागांसाठी भरती | Apply Online

Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2026 :
इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) अप्रेंटिसेस अॅक्ट 1961 आणि बँकेच्या अप्रेंटिसशिप धोरणानुसार आर्थिक वर्ष 2026-27 साठी एकूण 750 अप्रेंटिस जागांसाठी भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक HRDD/APPR/01/2026-27 असून ती दिनांक 6 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 7 जुलै 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.bankofindia.bank.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला IOB भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
IOB Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Jalna DCC Bank Recruitment 2026 तसेच HPCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| अप्रेंटिस (Apprentice) – 750 Post महाराष्ट्र : 85 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 07 जुलै 2026 ते 20 जुलै 2026 फी भरण्याची अंतिम तारीख – 22 जुलै 2026 ऑनलाइन परीक्षा – 02 ऑगस्ट 2026 (Tentative) |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS (महिला) : Rs.708/- ✔ SC / ST / PwBD : Rs.236/- ✔ General / OBC / EWS (पुरुष) : Rs.944/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 01 जुलै 2026 रोजी ✔ 20 वर्षे ते 28 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Metro Branch : ₹15,500 प्रति महिना (स्टायपेंड) Urban Branch : ₹14,500 प्रति महिना (स्टायपेंड) Semi Urban / Rural : ₹14,000 प्रति महिना (स्टायपेंड) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ ऑनलाइन परीक्षा (100 गुण, 90 मिनिटे) ✔ स्थानिक भाषा चाचणी ✔ कागदपत्र पडताळणी ✔ वैद्यकीय तपासणी ✔ अंतिम गुणवत्ता यादी |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduation Degree ✔ निकाल 31 जुलै 2026 पूर्वी लागलेला असावा. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| Apprenticeship (1 वर्ष) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम NATS पोर्टल (https://nats.education.gov.in) किंवा NAPS पोर्टल (https://www.apprenticeshipindia.gov.in) वर नोंदणी करा.
- त्यानंतर www.bfsissc.com किंवा https://beep.bfsissc.com या वेबसाईटला भेट द्या.
- “Career Opportunities” या पेजवर जाऊन “IOB Apprenticeship Program FY 2026-27” हा पर्याय निवडा.
- NATS नोंदणीकृत उमेदवारांनी संबंधित पोर्टलवर लॉगिन करून “Apply against advertised vacancies” येथून अर्ज करावा.
- NAPS नोंदणीकृत उमेदवारांनी पोर्टलवर “Indian Overseas Bank” शोधून “Apply for this Opportunity” वर क्लिक करावे.
- आपले वैयक्तिक, शैक्षणिक व NATS/NAPS नोंदणी क्रमांकाचे तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करा. आपल्या प्रवर्गानुसार (Category) ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
- अर्जाचा प्रिंटआउट काढून भविष्यातील वापरासाठी जपून ठेवा.
Note : उमेदवार फक्त एका राज्य/केंद्रशासित प्रदेशासाठी (शक्यतो स्वतःच्या गृहराज्यासाठी) अर्ज करू शकतो. अर्ज केल्यानंतर तो मागे घेता येणार नाही आणि भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
📌Exam Pattern 2026
| क्र. | विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|---|
| 1 | General / Financial Awareness | 25 | 25 |
| 2 | General English | 25 | 25 |
| 3 | Quantitative & Reasoning Aptitude | 25 | 25 |
| 4 | Computer / Subject Knowledge | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 | |
परीक्षा संबंधित महत्त्वाची माहिती
- परीक्षेचा प्रकार : ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा (Objective Type)
- एकूण प्रश्न : 100
- एकूण गुण : 100
- परीक्षेचा कालावधी : 90 मिनिटे
- प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र किमान गुण आवश्यक नाहीत.
- बँकेने निश्चित केलेले एकूण किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.
- SC/ST/OBC/PwBD उमेदवारांना एकूण पात्रता गुणांमध्ये 5% सूट मिळेल.
- समान गुण मिळाल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
- ऑनलाइन परीक्षा Desktop, Laptop, Tablet किंवा Smartphone वरून देता येईल.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. IOB Apprentice Recruitment 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉इंडियन ओव्हरसीज बँकेने FY 2026-27 साठी एकूण 750 अप्रेंटिस जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
Q2. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2026 आहे.
Q3. IOB Apprentice पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक असून निकाल 31 जुलै 2026 पूर्वी लागलेला असावा.
Q4. IOB Apprentice ला किती स्टायपेंड (वेतन) मिळेल?
👉मेट्रो शाखेसाठी ₹15,500/-, शहरी शाखेसाठी ₹14,500/- आणि निमशहरी/ग्रामीण शाखेसाठी ₹14,000/- प्रति महिना स्टायपेंड दिले जाईल.
Q5. IOB Apprentice ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे?
👉ऑनलाईन परीक्षेची तात्पुरती तारीख 2 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे.
Q6. अर्ज कोणत्या वेबसाईटवरून करायचा आहे?
👉अर्ज www.bfsissc.com किंवा https://beep.bfsissc.com या वेबसाईटवरून करावा लागेल. याआधी NATS किंवा NAPS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
Q6. अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर IOB मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळते का?
👉नाही, अप्रेंटिस हे बँकेचे “कर्मचारी” मानले जात नाहीत आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेत कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क उमेदवाराला राहणार नाही.





