Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

ठाणे महानगरपालिका अग्निशामक भरती 2026 : 381 पदांसाठी शुद्धीपत्रक जाहीर, होमगार्ड उमेदवारांसाठी अर्जाची मुदतवाढ | Apply Online |🔴 मुदतवाढ : 30 जुलै 2026

  • July 18, 2026
ठाणे महानगरपालिका अग्निशामक भरती 2026 : 381 पदांसाठी शुद्धीपत्रक जाहीर, होमगार्ड उमेदवारांसाठी अर्जाची मुदतवाढ | Apply Online |🔴 मुदतवाढ : 30 जुलै 2026

Thane Mahanagarpalika Fireman Bharti 2026 :

Thane Mahanagarpalika Fireman Recruitment 2026 : ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकामी जाहिरात (जा.क्र. ठामपा/पिआरओ/आस्था/५०६/२०२५-२६) दिनांक 10/08/2025 रोजी दैनिक वृत्तपत्रांमध्ये व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या मूळ जाहिरातीमध्ये फायरमन (अग्निशामक) पदाच्या एकूण 381 जागा समाविष्ट होत्या. आता दिनांक 17/07/2026 रोजी ठाणे महानगरपालिकेने या फायरमन पदासंदर्भात शुद्धीपत्रक (Corrigendum) जाहीर केले आहे. शासन निर्णय दि. 05 फेब्रुवारी 2008 नुसार, किमान 3 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व फायरमन पदासाठी आवश्यक शैक्षणिक/शारीरिक पात्रता तसेच विहित परीक्षा उत्तीर्ण होमगार्ड उमेदवारांकरिता फायरमन संवर्गाच्या 5% प्रमाणे एकूण 19 पदांचे समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे, त्यानुसार आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या शुद्धीपत्रकानुसार केवळ फायरमन पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास दिनांक 17/07/2026 ते 30/07/2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट http://www.thanecity.gov.in/ वर अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Thane Mahanagarpalika Fireman Bharti 2026 भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Thane Mahanagarpalika Fireman Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NBEMS Recruitment 2026 तसेच BEML Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
फायरमन (अग्निशामक गट-क) – 381 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
17 जुलै 2026 ते 30 जुलै 2026

आधी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी Edit सुविधा – 24 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ अमागास (खुला) – Rs.1000/-
✔ मागासवर्गीय /अनाथ – Rs.900/-
✔ माजी सैनिक व दिव्यांग – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
अमागास : 18 वर्षे ते 38 वर्षे
वयोमर्यादा सवलत – मागासवर्ग : 43 वर्षे, दिव्यांग : 45 वर्षे, माजी सैनिक : नियमानुसार, इतर आरक्षण : शासन नियमानुसार
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
S-5: Rs.18,000/- ते Rs.56,900/- प्रति महिना

👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
ठाणे, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाईन लेखी परीक्षा – 100 गुण, कालावधी 1 तास (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न)
✔ शारीरिक/मैदानी क्षमता चाचणी – 100 गुण
✔ एकूण गुण – 200
✔ अंतिम निवड यादी वरील दोन्ही टप्प्यांतील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) उत्तीर्ण.
✔ राष्ट्रीय/राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
✔ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)Corrigendum
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • “Recruitment / भरती” विभागातील फायरमन पद जाहिरात/शुद्धीपत्रक लिंकवर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी करून वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकाद्वारे प्रोफाईल तयार करा (आधीच अर्ज केला असल्यास पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, फक्त शुद्धीपत्रकाची माहिती लक्षात घ्यावी).
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक व शारीरिक पात्रता तपशील भरा.
  • विहित आकाराचा फोटो (3.5×4.5 सेमी) व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
  • होमगार्ड आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित सेवा प्रमाणपत्र अपलोड करावे.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा (रु. 1000/- खुला, रु. 900/- मागास प्रवर्ग).
  • अर्जाचे पूर्वावलोकन करून अंतिम सबमिट करा व प्रिंटआऊट जतन करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. हे शुद्धीपत्रक कोणत्या पदासाठी लागू आहे?

👉हे शुद्धीपत्रक फक्त फायरमन (अग्निशामक) पदासाठी लागू आहे, ठाणे महानगरपालिकेच्या इतर पदांसाठी नाही.

Q2. फायरमन पदाच्या एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 381 जागा असून, त्यापैकी 19 पदे होमगार्ड उमेदवारांसाठी समांतर आरक्षित आहेत.

Q3. शुद्धीपत्रकात नेमकी काय सुधारणा करण्यात आली आहे?

👉 शासन निर्णय दि. 05/02/2008 नुसार होमगार्डमध्ये किमान 3 वर्षे सेवा झालेल्या व आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी फायरमन संवर्गाच्या 5% (19 पदे) समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे.

Q4. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?

👉दिनांक 17/07/2026 ते 30/07/2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

Q.5 ज्यांनी आधीच फायरमन पदासाठी अर्ज केला आहे त्यांनी पुन्हा अर्ज करावा का?

👉आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही; ही मुदतवाढ नवीन इच्छुक व होमगार्ड उमेदवारांसाठी तसेच अर्ज न केलेल्या पात्र उमेदवारांसाठी आहे. (अचूक स्पष्टीकरणासाठी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना पहावी.)

Q.6 फायरमन पदासाठी शारीरिक पात्रता काय आहे?

👉उंची किमान 165 सें.मी. (महिला 157 सें.मी.), वजन किमान 50 कि.ग्रॅ. (महिला 45 कि.ग्रॅ.), छाती 81-86 सें.मी., चांगली दृष्टी व सुदृढ शरीरयष्टी आवश्यक.

Q.7 निवड प्रक्रिया कशी असेल?

👉100 गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा व 100 गुणांची शारीरिक/मैदानी क्षमता चाचणी अशी एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.

    Share this job