Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

SBI Clerk Recruitment 2026 : 9124 Junior Associate पदांची भरती | Apply Online

  • August 11, 2026
SBI Clerk Recruitment 2026 : 9124 Junior Associate पदांची भरती | Apply Online

SBI Clerk Recruitment 2026 :

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या क्लर्क संवर्गातील पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक CRPD/CR/2026-27/17 नुसार देशभरात एकूण 7680 नियमित जागा आणि 1444 बॅकलॉग जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून 11 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा. Authorized वेबसाइट sbi.bank.in/web/careers/current-openings वर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले 20 ते 28 वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेत प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी यांचा समावेश आहे.

या पोस्टमध्ये SBI Clerk Bharti 2026 संदर्भातील पदांचा तपशील दिला आहे. यामध्ये वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत दिली आहे. याशिवाय, Authorized नोटिफिकेशन PDF लिंक सादर केलेला आहे; Mahajobhub.in वेबसाइट नियमितपणे भेट द्या.

📍महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अमरावती, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि चंद्रपूर.

SBI Clerk Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी महाराष्ट्र CID गट क Bharti 2026 तसेच NTPC Limited Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Junior Associate (Customer Support & Sales) – 7680 (नियमित) + 1444 (बॅकलॉग)

Total – 9124 Post

महाराष्ट्र/मुंबई मेट्रो नियमित पदे – 1,718 Post
महाराष्ट्र/मुंबई मेट्रो Backlog पदे – 281
Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
11 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026

पूर्व परीक्षा (तात्पुरती) – सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा (तात्पुरती) – नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General/ OBC/ EWS : Rs.750/-
SC /ST /PwBD / XS/ DXS : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा (01 एप्रिल 2026 रोजी)
✔ 20 वर्षे ते 28 वर्षे (जन्म 02 एप्रिल 1998 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान असावा.)

(SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD General/EWS – +10 वर्षे
,PwBD (OBC) – +13 वर्षे, PwBD (SC/ST) – +15 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
सुरुवातीचा मूळ पगार (Basic Pay) – Rs.26,730/- (Rs.24,050/- + पदवीधरांसाठी दोन अतिरिक्त इन्क्रिमेंट)
✔ एकूण अंदाजे वेतन (Emoluments) – मुंबईसारख्या मेट्रो शहरात महागाई भत्ता व इतर भत्त्यांसह अंदाजे ₹46,000/- प्रति महिना

👉 इतर सुविधा: भविष्य निर्वाह निधी, नवीन पेन्शन योजना, वैद्यकीय सुविधा, रजा प्रवास सवलत (LFC) इ.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Preliminary Examination
✔ Main Examination
✔ Local Language Proficiency Test – लागू असल्यास

Document/Eligibility Verification
Note – Final merit साठी Preliminary Exam चे गुण जोडले जाणार नाहीत. Main Examination मधील aggregate marks वर merit list तयार केली जाईल.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील Graduation/पदवी किंवा भारत सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षात/सत्रात असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र निवड झाल्यास 31.12.2026 पूर्वी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाईट https://sbi.bank.in/web/careers/current-openings वर जा.
  • खाली स्क्रोल करून Recruitment of Junior Associates 2026 ही जाहिरात शोधा.
  • जाहिरात क्रमांक CRPD/CR/2026-27/17 डाउनलोड करून संपूर्ण वाचा.
  • Apply Online लिंकवर क्लिक करा व नोंदणी करा.
  • फोटो, स्वाक्षरी, डावा अंगठा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज पूर्ण भरून आवश्यक माहिती द्या व एक राज्य/UT निवडा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
  • अर्ज सबमिट करून प्रिंटआऊट काढून ठेवा (SBI कडे पाठवण्याची गरज नाही).

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)-

📝 Phase-I: Preliminary Examination

Preliminary Examination ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचा एकूण कालावधी 1 तास असून प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वेळ दिला जाईल.

अ. क्र.विषयप्रश्नकमाल गुणवेळ
1English Language303020 मिनिटे
2Numerical Ability353520 मिनिटे
3Reasoning Ability353520 मिनिटे
एकूण1001001 तास

Negative Marking: Objective Tests मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या निर्धारित गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल.

प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वेळ असेल. कोणत्याही विषयासाठी किंवा एकूण परीक्षेसाठी किमान qualifying marks निर्धारित केलेले नाहीत.

📝 Phase-II: Main Examination

Main Examination ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वेळ असून परीक्षेचा एकूण कालावधी 2 तास 40 मिनिटे आहे.

अ. क्र.विषयप्रश्नकमाल गुणवेळ
1General / Financial Awareness505035 मिनिटे
2General English404035 मिनिटे
3Quantitative Aptitude505045 मिनिटे
4Reasoning Ability & Computer Aptitude506045 मिनिटे
एकूण1902002 तास 40 मिनिटे

Negative Marking: Main Examination मधील Objective Tests मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या निर्धारित गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल.

Phase-III: Local Language Proficiency Test

ज्या उमेदवारांनी 10वी किंवा 12वीमध्ये अर्ज केलेल्या राज्याची संबंधित स्थानिक भाषा शिकलेली असल्याचा पुरावा दिलेला नाही, अशा provisionally selected उमेदवारांना Local Language Proficiency Test (LLPT) द्यावा लागेल.

10वी किंवा 12वीच्या Mark Sheet/Certificate मध्ये संबंधित स्थानिक भाषा शिकल्याचे नमूद असल्यास Language Test द्यावा लागणार नाही.

Note : Local Language Test मध्ये पात्र ठरले नाही तर उमेदवाराला नियुक्ती दिली जाणार नाही.

अंतिम निवड-

Preliminary Examination मधील गुण अंतिम Merit List साठी विचारात घेतले जाणार नाहीत. Main Examination मधील Aggregate Marks च्या आधारे State-wise आणि Category-wise Merit List तयार केली जाईल.

Final Selection हे पात्रतेची पडताळणी आणि लागू असल्यास Local Language Proficiency Test उत्तीर्ण करण्याच्या अधीन असेल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. SBI Junior Associate भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू आहेत?

👉 ऑनलाइन अर्ज 11 ऑगस्ट 2026 पासून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत करता येतील.

Q2. या भरतीत एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 7680 नियमित जागा आणि 1444 बॅकलॉग जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Q3. SBI Junior Associate पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) आवश्यक आहे.

Q4. वयोमर्यादा किती आहे?

👉01.04.2026 रोजी किमान 20 वर्षे व कमाल 28 वर्षे, प्रवर्गानुसार वयात सूट लागू आहे.

Q5. अर्ज शुल्क किती आहे?

👉General/OBC/EWS प्रवर्गासाठी रु. 750/- तर SC/ST/PwBD/XS/DXS उमेदवारांना शुल्क नाही.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि आवश्यक असल्यास स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी अशा तीन टप्प्यांत निवड होईल.

Q7. सुरुवातीचा पगार किती असेल?

👉सुरुवातीचा मूळ पगार ₹26,730/- असून मेट्रो शहरात एकूण अंदाजे वेतन ₹46,000/- प्रति महिना असेल.

Q8. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा कधी होणार आहे?

👉पूर्व परीक्षा तात्पुरती सप्टेंबर 2026 मध्ये आणि मुख्य परीक्षा तात्पुरती नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे.

Q10.एका उमेदवाराला किती राज्यांसाठी अर्ज करता येईल?

👉उमेदवार फक्त एकाच राज्य/केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करू शकतो.

    Share this job