महाराष्ट् CID गट क भरती 2026 पुन्हा सुरू : 16 सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज

📢 महत्त्वाची सूचना
दिनांक 05 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रानुसार अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
महाराष्ट्र CID गट क Recruitment 2026:
महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 अंतर्गत अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवर सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक (Assistant Government Document Examiner) या पदासाठी एकूण 16 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेद्वारे राबविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.mahacid.gov.in वर भेट द्यावी.
महाराष्ट्र CID गट क भरती 2026 अंतर्गत सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती जाहिरातीबाबत दिनांक 05 ऑगस्ट 2026 रोजी शुद्धीपत्र क्रमांक 2 जारी करण्यात आले आहे. या शुद्धीपत्रानुसार भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आता 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून 10 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अद्ययावत शुद्धीपत्र व अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र शासन गट क भरती 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS CSA Recruitment 2026 तसेच Kokan Railway Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक – 16 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 12 ऑगस्ट 2026 ते 10 सप्टेंबर 2026 (रात्री 12:00 वाजेपर्यंत) |
| परीक्षा शुल्क (Application Fees): |
|---|
| खुला प्रवर्ग : Rs.1000/- मागास प्रवर्ग : Rs. 900/- माजी सैनिक : शुल्क नाही The examination fee is non-refundable. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयोमर्यादा मोजण्याची अंतिम तारीख : 10 सप्टेंबर 2026 खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे मागास प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे अपंग उमेदवार : 18 ते 55 वर्षे माजी सैनिक : सेवाकाळ + 3 वर्षे सवलत |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| S-15 (Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| Pune, Maharashtra |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Paper-I : 120 गुण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी ✔ Paper-II : 80 गुण रसायनशास्त्र भौतिकशास्त्र न्यायसहायक विज्ञान (Forensic Science) ✔ पेपर-I मध्ये किमान 45% गुण मिळवणारे उमेदवारच Paper-II साठी पात्र ठरतील. ✔ अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) Paper-I व Paper-II मधील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाईल. ✔ मुलाखत नाही |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) – मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र (First/Second Class) / B.Sc. (Forensic Science) पदवी उत्तीर्ण |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) शुद्धीपत्र क्रमांक 2 | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक भरती 2026 मध्ये किती पदे आहेत?
👉या भरतीमध्ये एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Q2. ही भरती कायमस्वरूपी आहे का?
👉होय, ही भरती सरळसेवेने (Direct Recruitment) केली जाणार असून नियुक्ती कायमस्वरूपी (Permanent Government Job) स्वरूपाची आहे.
Q3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉विज्ञान शाखेतील पदवी (Chemistry व Physics मुख्य विषय) किंवा B.Sc. (Forensic Science) पदवी आवश्यक आहे.
Q4. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉 उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (200 गुण) केली जाईल. मुलाखत नाही.
Q5. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
👉10 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.





