Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद भरती 2026 : 4थी पास उमेदवारांसाठी स्वयंपाकी पदांची भरती | Apply Offline

  • August 22, 2026
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद भरती 2026 : 4थी पास उमेदवारांसाठी स्वयंपाकी पदांची भरती | Apply Offline

Mumbai High Court Bharti 2026 :

मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) यांच्यामार्फत आस्थापनेवरील “स्वयंपाकी” या पदाच्या रिक्त व भावी रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरात क्रमांक प्रशासन/1420/2026 अन्वये दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, एकूण 18 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 10 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत केवळ स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Mumbai High Court भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता (फक्त स्पीड पोस्टाद्वारे) – प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – 431009.

Mumbai High Court Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Bank of Baroda LBO Recruitment 2026 तसेच HAL Nashik Apprentice Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
स्वयंपाकी (Cook) – 18 Post

निवड यादीसाठी – 17 उमेदवार
प्रतीक्षा यादीसाठी – 04 उमेदवार
दिव्यांगांसाठी 1 पद राखीव असून जाहिरातीनुसार ते पद भविष्यात मार्गदर्शक तत्त्वे तयार झाल्यानंतर भरण्यात येईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
17 ऑगस्ट 2026 ते 10 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायचे नाही.
मात्र, Shortlist झालेल्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी Rs.200/- चा Demand Draft किंवा Postal Order द्यावा लागेल. (DD/Postal Order: “Registrar High Court Bench at Aurangabad” यांच्या नावे)
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा गणण्याची तारीख: 20 ऑगस्ट 2026
18 ते 38 वर्षे
✔ मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – 43 वर्षे
न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेची अट लागू नाही; मात्र त्यांनी कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी (Pay Scale):
S-3- Rs.16,600/- ते Rs.52,400/- (7 वा वेतन आयोग)
👉 नियमानुसार इतर भत्ते लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑफलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ प्रत्यक्षिक परीक्षा (उत्तीर्ण गुण किमान 15)(30 गुण)
✓ शारीरिक क्षमता चाचणी (10 गुण)
✓ तोंडी मुलाखत (10 गुण)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा.
✓ मराठी आणि हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
✓ स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान आणि संबंधित अनुभव असावा.
✓ सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक आहे.
✓ मान्यताप्राप्त संस्थेचे Cooking Course Certificate असल्यास प्राधान्य दिले जाईल.
✓ Cooking मध्ये पदवी/पदविका किंवा मान्यताप्राप्त संस्थेत/हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून 2 किंवा अधिक वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ कायमस्वरूपी
✓ नियुक्ती सुरुवातीला 2 वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी असेल.
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Application Formयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://bombayhighcourt.gov.in विहित नमुन्यातील अर्ज (परिशिष्ट “अ”) डाउनलोड करा.
  • अर्जात आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरा आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवा.
  • आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित छायाप्रती जोडा.
  • चारित्र्य प्रमाणपत्र (परिशिष्ट “ब”), लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र आणि स्वतःच्या पत्त्याचे पाच रुपयांचे तिकीट लावलेले पाकीट सोबत जोडा.
  • पाकिटावर ठळक अक्षरात “स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज” असे नमूद करा.
  • पूर्ण भरलेला अर्ज दिनांक 10 सप्टेंबर 2026 सायं. 5:00 पूर्वी फक्त स्पीड पोस्टने खालील पत्त्यावर पाठवा:
    प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – 431009
  • अल्पसूचीत निवड झाल्यास, रु. 200/- चा डी.डी./पोस्टल ऑर्डर “Registrar High Court Bench at Aurangabad” यांच्या नावे काढून प्रत्यक्षिक परीक्षेच्या वेळी सोबत आणा.

📌आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (4थी, 7वी, 10वी, 12वी, पदवी इ.)
  • जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
  • दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • स्वयंपाकाचा पूर्वानुभव असल्यास संबंधित हॉटेल/केटरिंग व्यावसायिकाचा अनुभव दाखला
  • विशेष पाककृतीबाबत प्राविण्याचा दाखला (असल्यास)
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • विवाहित महिला उमेदवारांसाठी नाव बदलाबाबतचा पुरावा
  • सेवायोजन कार्यालयात नोंद असल्यास नोंद प्रमाणपत्राची प्रत
  • आधार कार्डची प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्जासोबत दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, स्वतःच्या पत्त्याचे पाच रुपयांचे तिकीट लावलेले पाकीट आणि तयार करता येणाऱ्या पदार्थांची यादी जोडणे बंधनकारक आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्वयंपाकी भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉 या भरतीत स्वयंपाकी पदाच्या एकूण 18 जागा आहेत (17 निवड यादी + 1 दिव्यांग राखीव जागा), तसेच 4 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार केली जाईल.

Q2. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

👉 पात्र उमेदवारांनी अर्ज दिनांक 10 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे.

Q3. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य दिले जाईल.

Q4. वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवार 18 ते 38 वर्षे वयोगटातील असावा. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे.

Q5. अर्ज करताना शुल्क भरावे लागते का?

👉 अर्ज करताना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मात्र अल्पसूचीत निवड झालेल्या उमेदवारांना रु.200/- चा डी.डी./पोस्टल ऑर्डर सादर करावा लागेल.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉 निवड प्रक्रियेत स्वयंपाकाची प्रत्यक्षिक परीक्षा (30 गुण), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (10 गुण) आणि तोंडी मुलाखत (10 गुण) असे एकूण 50 गुणांचे मूल्यांकन केले जाईल.

Q7. अर्ज ऑनलाइन करता येईल का?

👉नाही, अर्ज केवळ विहित नमुन्यात भरून स्पीड पोस्टद्वारेच पाठवायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

    Share this job