Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

UPSC EPFO Recruitment 2026 : 80 सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) पदांसाठी भरती | Apply Online

  • August 21, 2026
UPSC EPFO Recruitment 2026 : 80 सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) पदांसाठी भरती | Apply Online

UPSC EPFO Recruitment 2026 :

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) विशेष जाहिरात क्रमांक 52/2026 अंतर्गत कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner – APFC) या पदाच्या एकूण 80 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही केंद्र सरकारच्या Group ‘A’ दर्जाची कायमस्वरूपी नोकरीची संधी असून, पगार 7 व्या वेतन आयोगानुसार Level-10 या वेतनस्तरावर दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 22 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://upsconline.nic.in/ora/ वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला UPSC EPFO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

UPSC EPFO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी VDGMC Latur Recruitment 2026 तसेच महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner – APFC) – 80 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
22 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026

लेखी परीक्षा (RT) : 20 डिसेंबर 2026
Interview Date: नंतर स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs.25/-
SC / ST / PwBD / महिला : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
UR/EWS – 35 वर्षे
OBC – 38 वर्षे
SC/ST – 40 वर्षे
(PwBD साठी 10 वर्षे सूट, कमाल वय 56 वर्षे)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- (7th CPC नुसार Pay Matrix Level-10)
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Recruitment Test (RT)
✔ मुलाखत (Interview)
✔ कागदपत्र पडताळणी (Document Verification)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता.
खालीलपैकी Diploma असल्यास प्राधान्य दिले जाऊ शकते:
1.Company Law
2.Labour Laws
3.Public Administration
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत संकेतस्थळ https://upsconline.nic.in/ora/ वर भेट द्या.
  • नवीन खाते तयार करून (Account Creation) Universal Registration Number (URN) मिळवा.
  • Common Application Form (CAF) भरून पूर्ण करा (फोटो व लाईव्ह फोटो अपलोड आवश्यक).
  • “Assistant Provident Fund Commissioner” या पद-विशिष्ट मॉड्यूलमध्ये जाऊन अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (जन्मतारीख पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, PwBD प्रमाणपत्र इ.) PDF स्वरूपात अपलोड करा.
  • लागू असल्यास रु. 25/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit/Credit Card/UPI/Net Banking) भरा.
  • अर्ज सबमिट करून प्रिंटआउट काढून ठेवा (URN व Application Number जपून ठेवा).

📌 आवश्यक कागदपत्रे

  • 10वीचा प्रमाणपत्र / जन्मतारखेचा पुरावा
  • Degree Certificate किंवा आवश्यक असल्यास Provisional Certificate व Mark Sheets
  • Caste Certificate
  • OBC उमेदवारांसाठी आवश्यक Declaration
  • PwBD Certificate
  • Age Relaxation संबंधित Certificate
  • Experience Certificate, लागू असल्यास
  • Photo ID Proof
  • इतर दावा केलेल्या पात्रतेसंबंधी आवश्यक कागदपत्रे

📌 परीक्षा पद्धती

UPSC EPFO Assistant Provident Fund Commissioner (APFC) पदासाठी उमेदवारांची निवड Recruitment Test (RT) आणि Interview या दोन टप्प्यांतून केली जाईल.

Recruitment Test (RT)

  • परीक्षा प्रकार: Pen & Paper Based
  • परीक्षेचा कालावधी: 2 तास
  • प्रश्नांचा प्रकार: Objective Type / Multiple Choice Questions (MCQ)
  • परीक्षेचे माध्यम: इंग्रजी आणि हिंदी
  • सर्व प्रश्नांना समान गुण असतील.
  • Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या गुणांपैकी 1/3 गुण वजा केले जातील.
  • प्रश्नाचे उत्तर न दिल्यास कोणतीही Negative Marking होणार नाही.
  • Recruitment Test चे एकूण गुण: 300

Interview

Recruitment Test मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना Interview साठी Shortlist केले जाईल.

  • Interview चे एकूण गुण: 100
  • General / EWS: किमान 50 गुण
  • OBC: किमान 45 गुण
  • SC / ST / PwBD: किमान 40 गुण

अंतिम निवडीसाठी Weightage

  • Recruitment Test: 300 गुण — 75% Weightage
  • Interview: 100 गुण — 25% Weightage

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. EPFO APFC भरती 2026 साठी अर्ज कुठे करावा?

👉उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळ https://upsconline.nic.in/ora/ वर ऑनलाईन अर्ज करावा.

Q2. EPFO APFC पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2026, सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे.

Q3. EPFO APFC पदासाठी एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 80 जागा असून यामध्ये UR-29, EWS-08, OBC-18, SC-15, ST-10 आणि त्यापैकी 3 जागा PwBD उमेदवारांसाठी राखीव आहेत.

Q4. EPFO APFC पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी आवश्यक आहे. Company Law/Labour Laws/Public Administration मधील डिप्लोमा इच्छनीय (Desirable) पात्रता आहे.

Q5. EPFO APFC पदासाठी वयोमर्यादा किती आहे?

👉UR/EWS उमेदवारांसाठी 35 वर्षे, OBC साठी 38 वर्षे आणि SC/ST साठी 40 वर्षे. PwBD उमेदवारांना कमाल 56 वर्षांच्या मर्यादेत 10 वर्षांची सूट मिळते.

Q6. EPFO APFC पदाची निवड प्रक्रिया काय आहे?

👉लेखी परीक्षा (Recruitment Test – 300 गुण) व त्यानंतर मुलाखत (100 गुण) या दोन टप्प्यांत निवड होते. दोघांचे गुणोत्तर 75:25 आहे.

Q7. अर्ज शुल्क किती आहे व कोणाला सूट आहे?

👉सर्वसाधारण/OBC/EWS पुरुष उमेदवारांना रु. 25/- शुल्क भरावे लागते. महिला तसेच SC/ST/PwBD उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट आहे.

Q8. लेखी परीक्षा (RT) कधी होणार आहे?

👉EPFO APFC पदासाठीची लेखी परीक्षा 20 डिसेंबर 2026 रोजी घेतली जाणार आहे.

Q9. निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

👉पदाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, मात्र या पदाला अखिल भारतीय सेवा दायित्व (All India Service liability) असल्याने देशात कुठेही नियुक्ती होऊ शकते.

    Share this job