रायगड महसूल सेवक भरती 2026 : मुरुड व अलिबाग तालुक्यात 30 जागांसाठी अर्ज सुरू | ४ थी पास पात्र | Apply Offline

Raigad Kotwal Bharti 2026 :
रायगड कोतवाल भरती 2026 साठी तहसील कार्यालय मुरुड आणि तहसील कार्यालय अलिबाग यांनी अधिकृत जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या सरळसेवा भरतीतून मुरुड तालुक्यात 11 आणि अलिबाग तालुक्यात 19 अशी एकूण 30 पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी किमान 4 थी उत्तीर्ण असणे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे पुरेसे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 2 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालय मुरुड येथे प्रत्यक्ष (ऑफलाइन) अर्ज सादर करावा.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Raigad Kotwal भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Raigad Kotwal Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Nashik Kotwal Recruitment 2026 तसेच Supreme Court JCA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ महसूल सेवक (कोतवाल) – 30 Post मुरुड तालुका – 11 Post अलिबाग तालुका – 19 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 अर्ज छाननी – 18/10/2026 ते 01/11/2026 प्रवेशपत्र – 04 ते 10 नोव्हेंबर 2026 लेखी परीक्षा – 15 नोव्हेंबर 2026 (रविवार) उत्तरसूची व निकाल – 16 नोव्हेंबर 2026 कागदपत्र पडताळणी – 17 ते 27 नोव्हेंबर 2026 नियुक्तीपत्र – 28 नोव्हेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ खुला प्रवर्ग: Rs.500/- ✔ मागास प्रवर्ग: Rs.300/- Note : परीक्षा शुल्क रोख स्वरूपात तहसीलदार, मुरुड / अलिबाग यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करताना जमा करायचे आहे. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयोमर्यादा गणण्याची तारीख : 02 ऑक्टोबर 2026 ✔ 18 ते 40 वर्षे |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.15,000/- प्रति महिना (शासनाच्या वेळोवेळी सुधारित दरानुसार मानधन देय राहील.) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ रायगड जिल्हा, महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑफलाइन (संबंधित तहसीलदार कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज घ्यायचा आणि भरलेला मूळ अर्ज स्वतः संबंधित तहसीलदार कार्यालयात जमा करायचा आहे.) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल. ✓ लेखी परीक्षा ✓ गुणवत्ता यादी/निवड ✓ कागदपत्र पडताळणी ✓ नियुक्ती Note : लेखी परीक्षा 100 गुणांची असून OMR पद्धतीने घेतली जाणार आहे. सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा, रायगड, जिल्ह्याचा भौगोलिक व ऐतिहासिक माहितीचा भाग (उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 गुण आवश्यक आहेत.) |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ किमान 4 थी उत्तीर्ण + मराठी भाषेचे ज्ञान |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| ✓ मानधन तत्त्वावर |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Application Form | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- जाहिरात वाचा: तुमच्या तालुक्याची (मुरुड किंवा अलिबाग) PDF वाचून पात्रता तपासा (4 थी पास, वय 18 ते 40, त्या तालुक्याचे रहिवासी).
- अर्ज मिळवा: कार्यालयीन वेळेत तहसीलदार कार्यालयातून ₹50 रोख भरून विहित अर्ज घ्या. झेरॉक्स किंवा इतरत्र छापलेला अर्ज बाद होईल.
- अर्ज भरा: आरक्षित प्रवर्ग अचूक नमूद करा. रंगीत फोटो चिकटवून स्वसाक्षांकित करा.
- कागदपत्रे जोडा: साक्षांकित प्रती आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन जोडा.
- शुल्क भरा: खुला प्रवर्ग ₹500, मागासवर्गीय ₹300 रोख भरून पावती घ्या.
- अर्ज जमा करा: 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रत्यक्ष जमा करा. पोस्ट किंवा ई-मेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- प्रवेशपत्र घ्या: 4 ते 10 नोव्हेंबर 2026 दरम्यान ओळखपत्र दाखवून तहसील कार्यालयातून प्रवेशपत्र घ्या.
- Note : ज्यांची नावे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदलेली आहेत, त्यांना विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा लागेल व परीक्षा शुल्क भरावे लागेल (जाहिरात मुद्दा 18). याची प्रक्रिया तहसील कार्यालयातून विचारून घ्या.
📌आवश्यक कागदपत्रे
- 4 थी उत्तीर्ण गुणपत्रिका (किंवा उच्च शिक्षणाची गुणपत्रिका).
- शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड / जन्मतारखेचा पुरावा.
- संबंधित तालुक्यातील गावाचा रहिवासी दाखला (मुख्याधिकारी नगरपरिषद किंवा ग्रामसेवक यांचा).
- महाराष्ट्राचे वय, अधिवास (डोमासाईल) प्रमाणपत्र.
- आधार, मतदान किंवा पॅन कार्डची स्वसाक्षांकित प्रत.
- जात प्रमाणपत्र, जात वैधता (असल्यास), नॉन-क्रिमीलेअर (31 मार्च 2027 पर्यंत वैध), EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन (विहित नमुन्यात). अविवाहित असल्यास तसे स्पष्ट नमूद करावे.
- ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र (पडताळणीच्या वेळी).
- अलीकडील रंगीत फोटो (अर्जावर चिकटवून स्वसाक्षांकित) + 2 अतिरिक्त रंगीत फोटो.
- महिला उमेदवारांनी अर्ज पूर्वाश्रमीच्या नावाने (By Birth) भरावा.
- सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्या आणि मूळ कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावीत.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. रायगड कोतवाल भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉 मुरुड तालुक्यात 11 आणि अलिबाग तालुक्यात 19, एकूण 30 पदे. पदसंख्येत बदल होऊ शकतो.
Q2. कोतवाल पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 किमान 4 थी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान.
Q3. वयोमर्यादा किती आहे?
👉 02/10/2026 रोजी किमान 18 आणि कमाल 40 वर्षे. हे पद अवर्गीकृत असल्याने सर्व प्रवर्गांना एकच मर्यादा आहे, वयात सवलत नाही.
Q4. कोतवालाला किती मानधन मिळते?
👉 जाहिरातीत वेतनश्रेणी दिलेली नाही. शासन नियमानुसार वेळोवेळी सुधारित मानधन मिळते. नियमित वेतन किंवा निवृत्ती लाभ नाहीत.
Q5. अर्ज ऑनलाइन करायचा आहे का?
👉 नाही. अर्ज संबंधित तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जमा करायचा आहे. पोस्ट किंवा ई-मेलने आलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत. (रोजगार केंद्रात नोंद असलेल्यांसाठी जाहिरातीत ऑनलाइन अर्जाची वेगळी अट आहे.)
Q6. परीक्षा शुल्क किती आहे?
👉 अर्ज शुल्क ₹50 आहे. परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹300 आणि इतर उमेदवारांसाठी ₹500 आहे.
Q7. अपंग, माजी सैनिक किंवा खेळाडू आरक्षण आहे का?
👉नाही. हे पद एका सजेत एकच असल्याने समांतर आरक्षण लागू नाही. क्षेत्रीय स्तरावर काम करावे लागत असल्याने अपंगांसाठीही आरक्षण नाही.
Q8. मुरुड आणि अलिबाग दोन्ही ठिकाणी अर्ज करता येईल का?
👉दोन्ही जाहिरातींमध्ये उमेदवार त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही रहिवासी असलेल्या एकाच तालुक्यासाठी अर्ज करावा.
Q9. ही कायमस्वरूपी नोकरी आहे का?
👉नाही. नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून पद अवर्गीकृत आहे. नियमित वेतन किंवा सेवानिवृत्ती लाभ मिळत नाहीत.




