Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

सिंधुदुर्ग महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 : 31 जागा | ४ थी पास | Apply Offline

  • October 04, 2026
सिंधुदुर्ग महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 : 31 जागा | ४ थी पास | Apply Offline

Sindhudurg Kotwal Bharti 2026 :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोतवाल भरती 2026 जाहीर झाली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय कणकवली आणि सावंतवाडी यांच्या अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या एकूण 31 जागा भरल्या जाणार आहेत. यात देवगड, कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या सहा तालुक्यांचा समावेश आहे. किमान 4थी उत्तीर्ण आणि 18 ते 40 वयोगटातील स्थानिक उमेदवार दि. 02 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयात ऑफलाईन अर्ज करू शकतात. निवड लेखी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार होईल आणि दरमहा ₹15,000 मानधन मिळेल.लेखी परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Sindhudurg Kotwal भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Sindhudurg Kotwal Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Nashik Kotwal Recruitment 2026 तसेच Supreme Court JCA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ महसूल सेवक (कोतवाल) – 31 Post

सिंधुदुर्ग जिल्हा तालुकानिहाय पदे –
देवगड – 04 Post
कणकवली – 08 Post
वैभववाडी – 03 Post
सावंतवाडी – 06 Post
वेंगुर्ला – 07 Post
दोडामार्ग – 03 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026

पात्र/अपात्र उमेदवारांची यादी – 02 नोव्हेंबर 2026
प्रवेशपत्र – 04 ते 10 नोव्हेंबर 2026
लेखी परीक्षा – 15 नोव्हेंबर 2026 (रविवार), सकाळी 11.00 ते 12.00
अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी – 16 नोव्हेंबर 2026
कागदपत्र पडताळणी – 17 ते 27 नोव्हेंबर 2026
नियुक्तीपत्र – 28 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ खुला प्रवर्ग: Rs.300/-
✔ मागास प्रवर्ग: Rs.200/-
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा गणण्याची तारीख : 02 ऑक्टोबर 2026
✔ 18 ते 40 वर्षे
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.15,000/- प्रति महिना
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑफलाइन (संबंधित तहसीलदार कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज घ्यायचा आणि भरलेला मूळ अर्ज स्वतः संबंधित तहसीलदार कार्यालयात जमा करायचा आहे.)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ लेखी परीक्षा
✓ गुणवत्ता यादी/निवड
✓ कागदपत्र पडताळणी
✓ नियुक्ती


Note : लेखी परीक्षा 100 गुणांची असून OMR पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती यांचा समावेश आहे. चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन नाही. (उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 गुण आवश्यक आहेत.)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
✓
शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्र/गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ मानधन तत्त्वावर
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Application Formयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • तुमच्या तालुक्याचे तहसील कार्यालय (देवगड, कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ला किंवा दोडामार्ग) गाठा.
  • कार्यालयीन वेळेत (सकाळी 09.45 ते सायं. 06.15) ₹50 रोख भरून विहित नमुन्यातील अर्ज घ्या.
  • अर्ज पूर्ण आणि अचूक भरा. साझ्याचे नाव आणि प्रवर्ग भरणे अत्यावश्यक आहे.
  • ₹5 चा कोर्ट फी स्टॅम्प अर्जावर चिकटवा आणि फोटो लावून स्वाक्षरी करा.
  • सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडा.
  • परीक्षा शुल्क (₹200 किंवा ₹300) रोखीने भरा. धनादेश आणि डिमांड ड्राफ्ट स्वीकारले जाणार नाहीत.
  • 17 ऑक्टोबर 2026 सायं. 06.15 पर्यंत अर्ज स्वतः उपस्थित राहून त्याच तहसील कार्यालयात जमा करा.
  • पोस्ट, ई-मेल किंवा झेरॉक्स अर्ज स्वीकारले जात नाहीत. प्रवेशपत्र तहसील कार्यालयातून स्वतः घ्या.

📌आवश्यक कागदपत्रे

  • 4थी पास गुणपत्रक/प्रमाणपत्र किंवा त्यावरील परीक्षेचे प्रमाणपत्र
  • वयाच्या पुराव्याची स्वसाक्षांकित प्रत
  • तालुक्याचा रहिवासी दाखला (स्वसाक्षांकित)
  • जात प्रमाणपत्र आणि लागू असल्यास नॉन क्रिमीलेअर / EWS प्रमाणपत्र
  • 2 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (नमुना “अ”)
  • विवाहित महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र / नाव बदलाचे राजपत्र
  • परीक्षा शुल्क भरल्याची पावती
  • गुन्हेगारी नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. सिंधुदुर्ग महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 31 जागा आहेत: देवगड 4, कणकवली 8, वैभववाडी 3, सावंतवाडी 6, वेंगुर्ला 7, दोडामार्ग 3.

Q2. कोतवाल पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q3. वयोमर्यादा किती आहे?

👉 18 ते 40 वर्षे. अपंग, माजी सैनिक, खेळाडू इत्यादींसाठी वयोमर्यादेत सवलत नाही.

Q4. कोतवालाला किती मानधन मिळते?

👉 दरमहा ₹15,000 मानधन मिळते. ही नेमणूक अस्थायी असून सेवानिवृत्ती लाभ अनुज्ञेय नाहीत.

Q5. अर्ज ऑनलाइन करायचा आहे का?

👉 नाही. अर्ज ऑफलाइन असून तो संबंधित तहसीलदार कार्यालयात समक्ष सादर करायचा आहे. पोस्ट किंवा ईमेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Q6. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 अर्ज शुल्क ₹50 आहे. परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹200 आणि इतर उमेदवारांसाठी ₹300 आहे.

Q7. लेखी परीक्षा कधी आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का?

👉परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आहे. 50 प्रश्न आणि 100 गुण असून पास होण्यासाठी 40 गुण लागतात. निगेटिव्ह मार्किंग नाही.

Q8. दुसऱ्या तालुक्यातील उमेदवार अर्ज करू शकतो का?

👉नाही. उमेदवार ज्या तालुक्याचा स्थानिक रहिवासी आहे, त्याच तालुक्यासाठी अर्ज करता येतो.

Q9. ही कायमस्वरूपी नोकरी आहे का?

👉नाही. नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून पद अवर्गीकृत आहे. नियमित वेतन किंवा सेवानिवृत्ती लाभ मिळत नाहीत.

    Share this job