Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

Nashik Kotwal Recruitment 2026 : महसूल सेवक (कोतवाल) भरती, 156 जागा | 4 थी पास | Apply Online

  • October 03, 2026
Nashik Kotwal Recruitment 2026 : महसूल सेवक (कोतवाल) भरती, 156 जागा | 4 थी पास | Apply Online

Nashik Kotwal Bharti 2026 :

नाशिक जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकूण 156 रिक्त महसूल सेवक (कोतवाल) पदांना शासनाने मान्यता दिली आहे. या पदासाठी किमान 4 थी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता असून, वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. पदाचे मानधन ₹15,000 प्रति महिना आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज 03 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान https://nashik.kotwal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन करायचे आहेत. प्रेस नोटनुसार नाशिक, सुरगाणा, अंबेगाव, पेठ, बागलाण, देवळा, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, चांदवड, निफाड, येवला, सिन्नर, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये मिळून 156 रिक्त पदे आहेत.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Nashik Kotwal भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Nashik Kotwal Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी ITBP Head Constable Recruitment 2026 तसेच Supreme Court JCA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ महसूल सेवक (कोतवाल) – 156 Post

नाशिक जिल्हा तालुकानिहाय पदे (प्रेस नोट) –
नाशिक – 16 Post
सुरगाणा – 12 Post
त्र्यंबकेश्वर – 03 Post
पेठ – 04 Post
बागलाण – 26 Post
देवळा – 08 Post
इगतपुरी – 10 Post
दिंडोरी – 16 Post
कळवण – 14 Post
चांदवड – 04 Post
निफाड – 11 Post
येवला – 05 Post
सिन्नर – 07 Post
मालेगाव – 14 Post
नांदगाव – 06 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
03 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 17 ऑक्टोबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ खुला प्रवर्ग: Rs.600/- + बँक चार्जेस
✔ मागास प्रवर्ग: Rs.500/- + बँक चार्जेस
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा गणण्याची तारीख : 03 ऑक्टोबर 2026
✔ 18 ते 40 वर्षे
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.15,000/- प्रति महिना
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ नाशिक जिल्ह्यातील संबंधित तालुका
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ 50 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा (100 गुण), सामान्यज्ञानावर आधारित.
✓ लेखी परीक्षेत किमान 40 गुण आवश्यक.
✓ गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड यादी, त्यानंतर मूळ कागदपत्र पडताळणी.
✓ वैद्यकीय तपासणी व अंतिम निवड यादी.
✓ गुण समान असल्यास शासन निर्णय दि. 13 जून 2018 नुसार निकष. तसेच, इतर बाबी समान असल्यास त्या सजेतील पूर्वीच्या कोतवालाच्या वारसांना प्राधान्य मिळेल.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
✓
याशिवाय अर्जदार संबंधित सजेतील गावाचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असल्याची अट जाहिरातीत नमूद आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ मानधन तत्त्वावर
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
प्रेस नोट
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • https://nashik.kotwal.org या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • येवला कोतवाल भरती 2026 जाहिरात (01/2026) काळजीपूर्वक वाचा.
  • नोंदणी करून चालू मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्या (चुकीचा नंबर किंवा DND नंबर असल्यास सूचना मिळणार नाहीत).
  • आपली सजा निवडा (आपले गाव त्या सजेत असल्याची खात्री करा) आणि प्रवर्ग/आरक्षण तपासून माहिती भरा.
  • अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • नेटबँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / गुगल पे / फोन पे द्वारे परीक्षा शुल्क भरा (Payment Transaction Successful झाल्याची खात्री करा).
  • अर्ज सबमिट करून प्रिंट काढा. 17 ऑक्टोबर 2026 सायं. 05:45 पूर्वी अर्ज पूर्ण करा.

📌आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो व सही (ऑनलाईन अपलोड)
  • शाळा सोडल्याचा दाखला / शैक्षणिक कागदपत्रे (4थी पास)
  • रहिवासी पुरावा (संबंधित सजेतील)
  • जात प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी) व 31/03/2027 पर्यंत वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (SC/ST वगळता)
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (दि. 28/03/2005 नंतर 2 पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबत)
  • पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र
  • राजकीय पक्षाशी संबंध नसल्याबाबत ₹100 च्या स्टँप पेपरवरील प्रतिज्ञापत्र
  • शारीरिक सक्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र
  • महिला आरक्षणासाठी महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) प्रमाणपत्र

अर्जासोबत दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, स्वतःच्या पत्त्याचे पाच रुपयांचे तिकीट लावलेले पाकीट आणि तयार करता येणाऱ्या पदार्थांची यादी जोडणे बंधनकारक आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Nashik Kotwal Bharti 2026 मध्ये किती पदे आहेत?

👉 नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) पदांची एकूण 156 रिक्त पदे आहेत.

Q2. कोतवाल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवार किमान 4थी पास असावा आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.

Q3. वयोमर्यादा किती आहे?

👉 दि. 03/10/2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.

Q4. कोतवालाला किती मानधन मिळते?

👉 जाहिरातीनुसार दरमहा ₹15,000/- मानधन मिळते (शासन निर्णय दि. 06/04/2023 नुसार).

Q5. अर्ज कधी आणि कुठे करायचा?

👉 03 ऑक्टोबर 2026 सकाळी 10:00 ते 17 ऑक्टोबर 2026 सायं. 05:45 पर्यंत, फक्त https://nashik.kotwal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन.

Q6. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 खुला प्रवर्ग ₹600/- आणि मागास प्रवर्ग ₹500/- (बँक प्रोसेसिंग चार्जेस वेगळे).

Q7. निवड कशी केली जाईल?

👉50 प्रश्नांची (100 गुण) लेखी परीक्षा, त्यात किमान 40 गुण आवश्यक. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी व अंतिम निवड यादी.

Q8. दुसऱ्या गावातील उमेदवार अर्ज करू शकतो का?

👉नाही. उमेदवार ज्या सजेसाठी अर्ज करतो, त्याच सजेतील गावांचा रहिवासी असणे आवश्यक आहे. एकाच सजेसाठी अर्ज करता येतो.

    Share this job