Union Bank Specialist Officer Recruitment 2026 : 395 जागांसाठी भरती | Apply Online

Union Bank SO Recruitment 2026 :
Union Bank of India या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने “Union Bank Recruitment Project 2026-27 (Officers with Domain Expertise, General Banking Officers & Specialist Officers)” या नावाने मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर तसेच सायबर सिक्युरिटी, डेटा सायंटिस्ट, फॉरेक्स ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, लॉ ऑफिसर, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर यांसारख्या विविध स्पेशालिस्ट पदांसह एकूण 395 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 21 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.unionbankofindia.co.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला Union Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
📍महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे : मुंबई/नवी मुंबई/ठाणे (MMR), नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर.
Union Bank SO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Thane Mahanagarpalika Fireman Bharti 2026 तसेच WCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Manager (MMGS-II) – 163 Post ✔ Senior Manager (MMGS-III) – 153 Post ✔ Chief Manager (SMGS-IV) – 52 Post ✔ Assistant General Manager (SMGS-V) – 20 Post ✔ Deputy General Manager (TEGS-VI) – 7 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 21 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.1180/- ✔ SC / ST / PwBD : Rs.177/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| (01 जुलै 2006 रोजी ) ✔ 22 वर्षे ते 50 वर्षे (पदानुसार) (SC/ST – +5 वर्षे, OBC (Non Creamy Layer) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – +5 वर्षे) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Manager (MMGS-II) – ₹64,820 – ₹93,960 ✔ Senior Manager (MMGS-III) – ₹85,920 – ₹1,05,280 ✔ Chief Manager (SMGS-IV) – ₹1,02,300 – ₹1,20,940 ✔ Assistant General Manager (SMGS-V) – ₹1,20,940 – ₹1,35,020 ✔ Deputy General Manager (TEGS-VI) – ₹1,40,500 – ₹1,56,500 👉याशिवाय DA, Special Allowance, HRA/Lease, Medical, LFC व इतर बँक भत्ते लागू राहतील. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Online Exam (Scale-III पर्यंत) – Quantitative Aptitude, Reasoning, English, Professional Knowledge ✔ Group Discussion (आवश्यकतेनुसार) ✔ Personal Interview – 100 गुण Scale IV, V, VI साठी GD/इतर टेस्ट व मुलाखतीद्वारे निवड होईल. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे: ✔ जनरल बँकिंग पदे: कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग अनुभव ✔ IT पदे: संबंधित शाखेतील B.E./B.Tech/MCA/M.Sc व अनुभव ✔ CA पदे: ICAI कडून चार्टर्ड अकाउंटंट पदवी ✔ Law Officer: कायद्याची पदवी + अनुभव ✔ आर्किटेक्ट/इंजिनिअर: संबंधित पदवी + शासकीय अनुभव 👉 सविस्तर पात्रता प्रत्येक पदासाठी अधिकृत जाहिरातीत नमूद आहे. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट www.unionbankofindia.co.in वर जा.
- ‘Recruitment’ → ‘Careers Overview’ वर क्लिक करा.
- संबंधित जाहिरातीची लिंक ओपन करा.
- ‘Click Here to Apply Online’ वर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करून Registration Number/Password मिळवा.
- फोटो, सही, अंगठ्याचा ठसा अपलोड करा.
- अर्जातील सर्व माहिती भरून तपासा.
- ऑनलाईन फी भरा.
- अर्ज सबमिट करून प्रिंटआऊट काढून ठेवा.
📌 आवश्यक कागदपत्रे
- अलीकडील पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- 10वी/12वी गुणपत्रिका
- पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- संबंधित Professional Certification (लागू असल्यास)
- जातीचा दाखला (SC/ST/OBC)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- फोटो ओळखपत्र (Aadhaar/PAN/Passport/Driving Licence इ.)
📌 परीक्षा पद्धती
Union Bank of India भरतीमध्ये पदानुसार निवड प्रक्रिया वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
1) Scale-II ते Scale-III (G01 ते G19 – General Banking)
| विषय | प्रश्न | गुण | कालावधी |
|---|---|---|---|
| Quantitative Aptitude | 25 | 25 | 60 मिनिटे |
| Reasoning | 25 | 25 | |
| English Language | 25 | 25 | |
| Professional Knowledge (संबंधित पद) | 50 | 100 | 60 मिनिटे |
| एकूण | 125 | 175 | 120 मिनिटे |
Note : Quantitative Aptitude, Reasoning आणि English Language हे तीन विभाग फक्त पात्रता (Qualifying) स्वरूपाचे आहेत. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना या तीन विभागांचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. अंतिम मेरिटसाठी Professional Knowledge या पेपरचे गुण विचारात घेतले जातील.
2) Scale-II ते Scale-III (S01 ते S108 – Specialist Officer)
| विषय | प्रश्न | गुण | कालावधी |
|---|---|---|---|
| Professional Knowledge (संबंधित पद) | 50 | 100 | 60 मिनिटे |
| एकूण | 50 | 100 | 60 मिनिटे |
3) Scale-IV, Scale-V आणि Scale-VI पदांसाठी निवड प्रक्रिया
- Group Discussion (आवश्यक असल्यास)
- इतर Test / Assessment (आवश्यक असल्यास)
- Personal Interview
या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा किंवा न घेण्याचा अंतिम निर्णय Union Bank अर्जदारांच्या संख्येनुसार घेईल.
महत्त्वाच्या सूचना –
- बँक अर्जदारांच्या संख्येनुसार Online Examination, Group Discussion किंवा इतर Test घेऊ शकते.
- किमान पात्रता पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही.
- ऑनलाइन परीक्षा झाल्यास त्यानंतर Shortlisting करून Group Discussion / Interview घेतले जाऊ शकते.
- निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा अधिकार Union Bank कडे राखीव आहे.
अंतिम निवड : पदानुसार Online Examination (लागू असल्यास), Group Discussion (लागू असल्यास), इतर Assessment (लागू असल्यास) आणि Personal Interview यांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
- निगेटिव्ह मार्किंग (1/4 किंवा 25%)
- General/EWS साठी 40% व Reserved साठी 35% पात्रता गुण.
- Personal Interview 100 गुणांचा असून General/EWS साठी 50 व Reserved साठी 45 गुण आवश्यक.
- अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा/Group Discussion/इतर Test/Interview यांच्या आधारे होईल.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1.Union Bank Recruitment 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉या भरतीत एकूण 395 जागा आहेत.
Q2.Union Bank Recruitment 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होईल?
👉 अर्ज 21 जुलै 2026 पासून सुरू होतील आणि 10 ऑगस्ट 2026 पर्यंत करता येतील.
Q3. Union Bank Recruitment 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
👉 SC/ST/PwBD साठी ₹177/- आणि इतर प्रवर्गासाठी ₹1180/- आहे.
Q4. या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
👉पदानुसार ऑनलाईन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे निवड होईल.
Q5. उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो का?
👉नाही, एक उमेदवार फक्त एका पदासाठीच अर्ज करू शकतो.
Q6. निवड झाल्यास प्रोबेशन कालावधी किती असेल?
👉निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल.





