SBI PO Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1500 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती | पदवीधरांना सुवर्णसंधी | Apply Online

SBI PO Recruitment 2026 :
SBI PO Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या 1500 जागांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती जाहिरात क्रमांक CRPD/PO/2026-27/09 अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भारतातील कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 18 जून 2026 ते 08 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट sbi.bank.in/web/careers/current-openings वर ऑनलाईन अर्ज करावा. याशिवाय निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाईज व मुलाखत या तीन टप्प्यांत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला SBI PO Recruitment 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
SBI PO Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी TIFR Mumbai Bharti 2026 तसेच Bombay High Court Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Probationary Officer (PO) – 1500 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 18 जून 2026 ते 08 जुलै 2026 📌Phase-I: Preliminary Exam : ऑगस्ट 2026 📌Phase-II: Main Exam : सप्टेंबर 2026 📌Phase-III: Psychometric Test / Interview : ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 📌अंतिम निकाल : नोव्हेंबर/डिसेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS – Rs.750/- ✔ SC / ST / PwBD – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 01 एप्रिल 2026 रोजी ✔ 21 ते 30 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen : +5 वर्षे ) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.48,480/- ते Rs.85,920/- 👉 यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✓ Phase-I – Preliminary Online Examination ✓ Phase-II – Main Online Examination Objective Test Descriptive Test ✓ Phase-III – Psychometric Test Group Exercise Personal Interview अंतिम गुणवत्ता यादी Main Exam + Group Exercise + Interview यांच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. Preliminary परीक्षेचे गुण अंतिम मेरिटमध्ये धरले जाणार नाहीत. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) ✓ अंतिम वर्ष/सेमिस्टरचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, मात्र 30 सप्टेंबर 2026 पूर्वी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा आवश्यक आहे. ✓ इंजिनिअरिंग, मेडिकल, CA, Cost Accountant, Integrated Dual Degree इत्यादी पात्र उमेदवारही अर्ज करू शकतात. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी (Permanent) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌आवश्यक कागदपत्रे –
- फोटो
- स्वाक्षरी
- डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा
- हस्तलिखित घोषणा
- पदवी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- ओळखपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.bank.in/web/careers/current-openings वर जा.
- होमपेजवर CRPD/PO/2026-27/09 या जाहिरातीवर क्लिक करा.
- जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचा.
- Apply Online लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी करा.
- फोटो, सिग्नेचर, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
📌 SBI PO Recruitment 2026 Exam Pattern
SBI PO भरती प्रक्रिया एकूण 3 टप्प्यांमध्ये पार पडते. Preliminary परीक्षा पात्रता स्वरूपाची असून अंतिम गुणवत्ता यादी Main Examination + Group Exercise + Personal Interview यांच्या गुणांच्या आधारे तयार केली जाते.
Phase-I : Preliminary Examination
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| English Language | 40 | 40 | 20 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 30 | 30 | 20 मिनिटे |
| Reasoning Ability | 30 | 30 | 20 मिनिटे |
| एकूण | 100 | 100 | 60 मिनिटे |
- परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
- Preliminary परीक्षेत कोणताही Sectional Cut-off नाही.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांची Negative Marking लागू आहे.
- प्रत्येक प्रवर्गातील रिक्त जागांच्या सुमारे 10 पट उमेदवार Main परीक्षेसाठी पात्र ठरतील.
Phase-II : Main Examination
Main परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाते – Objective Test आणि Descriptive Test.
Objective Test
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning & Computer Aptitude | 40 | 60 | 50 मिनिटे |
| Data Analysis & Interpretation | 30 | 60 | 45 मिनिटे |
| General Awareness / Economy / Banking Knowledge | 60 | 60 | 45 मिनिटे |
| English Language | 40 | 20 | 40 मिनिटे |
| एकूण | 170 | 200 | 3 तास |
Descriptive Test
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Communication Skills (Email Writing, Situation Analysis, Report Writing / Precis Writing) | 3 | 30 | 30 मिनिटे |
- Objective परीक्षा संपल्यानंतर लगेच Descriptive Test घेतली जाईल.
- Descriptive परीक्षेतील उत्तरे संगणकावर टाइप करावी लागतील.
- Main परीक्षेत प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र Sectional Cut-off असेल.
- Main परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त जागांच्या सुमारे 3 पट उमेदवार Phase-III साठी निवडले जातील.
- Objective परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांची Negative Marking लागू राहील.
Phase-III : Psychometric Test, Group Exercise & Personal Interview
| टप्पा | गुण |
|---|---|
| Psychometric Test | व्यक्तिमत्त्व मूल्यांकनासाठी |
| Group Exercise | 20 |
| Personal Interview | 30 |
| एकूण | 50 गुण |
Final Selection
| टप्पा | कमाल गुण | Weightage |
|---|---|---|
| Main Examination (Objective + Descriptive) | 230 | 75 |
| Group Exercise + Personal Interview | 50 | 25 |
| अंतिम गुणवत्ता यादी | 280 | 100 |
✔ Preliminary परीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
✔ अंतिम निवड Main Examination, Group Exercise आणि Personal Interview मधील गुणांच्या आधारे केली जाईल.
✔ Objective परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांची Negative Marking लागू आहे.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SBI PO भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 1500 जागांसाठी ही भरती जाहीर झाली आहे.
Q2. SBI PO साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2026 आहे.
Q3. SBI PO साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) आवश्यक आहे.
Q4. SBI PO साठी वयोमर्यादा किती आहे?
👉 उमेदवाराचे वय 01.04.2026 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
Q5. SBI PO पदाचे सुरुवातीचे वेतन किती आहे?
👉 सुरुवातीचा बेसिक पे ₹48,480/- असून मुंबई केंद्रासाठी अंदाजे वार्षिक CTC ₹21.97 लाख आहे.
Q6. SBI PO निवड प्रक्रिया कशी आहे?
👉 पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाईज व मुलाखत या तीन टप्प्यांत निवड होईल.




