आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती 2026 : चौकीदार (Watchman) 416 जागा | Apply Online

आदिवासी विकास विभाग भरती 2026 :
Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2026 : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत (Tribal Development Department) शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार (गट-ड) पदांसाठी सरळसेवा भरती 2026 जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक: आस्था-पद भरती-2025/प्र.क्र.65/का.2(8)/नाशिक, दिनांक 27 एप्रिल 2026 नुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) अंतर्गत 29 प्रकल्प कार्यालयांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. फक्त SSC (दहावी) पास उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट https://tribal.maharashtra.gov.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला आदिवासी विकास विभाग नाशिक भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी BPCL Recruitment 2026 तसेच RCFL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालयी परीक्षा होईल.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| चौकीदार (गट-ड) / Watchman – 416 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 27 एप्रिल 2026 ते 18 May 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ खुला (Open / General) – Rs.1,000/- ✔ मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग – Rs.900/- ✔ माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 ते 38 वर्षे (SC/ST : +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, माजी सैनिक : नियमानुसार) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.15,000/- ते Rs.47,600)/-( S-1 वेतन श्रेणी) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| महाराष्ट्र राज्यातील 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहे. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✔ ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT – Computer Based Test) माध्यम: मराठी प्रश्नप्रकार: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) एकूण गुण: 200 प्रत्येक प्रश्नाचे गुण: 2 परीक्षा कालावधी: 120 मिनिटे (2 तास) ✔ विषयनिहाय गुण: मराठी – 50 इंग्रजी – 50 सामान्य ज्ञान – 50 बौद्धिक चाचणी – 50 एकूण – 200 Marks 📌 किमान पात्रता गुण: 45% (गुणवत्ता यादीत समावेशासाठी) 📌 शारीरिक/व्यावसायिक चाचणी नाही. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ माध्यमिक शालांत (SSC) परीक्षा उत्तीर्ण |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या –tdcwatchman2026.cbtexam.in
2️⃣ “APPLY ONLINE” वर क्लिक करा → “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” निवडा.
3️⃣ नाव, ईमेल, मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा → Registration No. व Password मिळवा.
4️⃣ फोटो (20-50 KB), स्वाक्षरी (10-20 KB), डावा अंगठ्याचा ठसा व घोषणापत्र अपलोड करा.
5️⃣सर्व वैयक्तिक, शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा व ज्या ITDP प्रकल्पासाठी अर्ज करायचा ते निवडा . 6️⃣ “Submit” क्लिक करा → “Proceed to Payment” वर जा आणि परीक्षा शुल्क भरा (UPI/Debit Card/Credit Card/Net Banking). तसेच E-Receipt व अर्जाची Print Out काढून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. चौकीदार भरती 2026 साठी किती जागा आहेत?
👉 आदिवासी विकास विभागाच्या 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) अंतर्गत विविध प्रवर्गांसाठी जागा आहेत. प्रत्येक ITDP साठी स्वतंत्र रोस्टर जाहिरातीत दिला आहे.
Q2. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 फक्त SSC (दहावी / माध्यमिक शालान्त परीक्षा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Q3. परीक्षा कशा प्रकारे होईल?
👉 ऑनलाईन CBT (Computer Based Test) पद्धतीने, मराठी माध्यमातून, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) प्रश्नांवर आधारित 200 गुणांची परीक्षा होईल.
Q4. परीक्षेसाठी कमाल वेळ किती आहे?
👉 120 मिनिटे (2 तास). दिव्यांग/दृष्टिहीन उमेदवारांना प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळेल.
Q5. परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) आहे का?
👉 जाहिरातीत नकारात्मक गुणांचा उल्लेख नाही. फक्त बरोबर उत्तरांचे गुण मोजले जातील.
Q6. गुणवत्ता यादीत येण्यासाठी किमान किती गुण हवेत?
👉 किमान 45% गुण आवश्यक आहेत.
Q7. शारीरिक चाचणी (Physical Test) आहे का?
👉 नाही. या पदासाठी शारीरिक किंवा व्यावसायिक चाचणी नाही.
Q8. अर्ज ऑफलाईन करता येईल का?
👉 नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीने tdcwatchman2026.cbtexam.in वर अर्ज करावा लागेल.
Q9. एकापेक्षा जास्त ITDP साठी अर्ज करता येईल का?
👉 होय, पण प्रत्येकासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.





