Canara Bank Apprentice Recruitment 2026 : 3500 जागांसाठी भरती | Apply Online

Canara Bank Apprentice Recruitment 2026 :
Canara Bank Apprentice Recruitment 2026 अंतर्गत Canara Bank मध्ये Graduate Apprentices म्हणून प्रशिक्षणासाठी एकूण 3500 Training Seats उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NATS Apprenticeship Portal वर नोंदणी करून आपले profile 100% पूर्ण करणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये Maharashtra साठी 205 Training Seats असून स्थानिक भाषा Marathi आहे. Graduate उमेदवारांसाठी ही 12 महिन्यांची Apprenticeship Training असून दरमहा ₹16,650 स्टायपेंड दिला जाणार आहे. निवड लेखी परीक्षेशिवाय, 12वी/डिप्लोमा गुणांच्या आधारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 01 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.canarabank.bank.in किंवा nats.education.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला Canara Bank Apprentice भरती 2026 संदर्भातील खाली पदनिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया थोडक्यात दिली आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Canara Bank Apprentice Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Bank of India Recruitment 2026 तसेच IBPS Hindi Officer Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Graduate Apprentice (पदवीधर अप्रेंटिस) – 3500 Post ✔ Maharashtra – 205 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 01 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 पात्रता मोजण्याची तारीख: 01 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ इतर सर्व : Rs.500/- ✔ SC / ST / PwBD : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 वर्षे ते 28 वर्षे (जन्म 02 सप्टेंबर 1998 ते 01 सप्टेंबर 2006 दरम्यान) (SC/ST- +5 वर्षे, OBC(NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, विधवा/घटस्फोटित/विभक्त महिला – General/EWS – 35, OBC – 38, SC/ST – 40 वर्षांपर्यंत) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.16,650/- प्रति महिना |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ संपूर्ण भारत (निवडलेल्या राज्यातील शाखा (एकच राज्य निवडता येईल; जिल्हा बँकेच्या गरजेनुसार)) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ लेखी परीक्षा नाही. राज्यनिहाय मेरिट लिस्ट 12वी (HSC)/डिप्लोमा टक्केवारीवर तयार होईल. ✔ गुण समान असल्यास मोठ्या वयाच्या उमेदवाराला प्राधान्य. ✔ Document Verification ✔ लागू असल्यास Local Language Test ✔ Medical Fitness ✔ अंतिम निवड. NATS पोर्टलवर डिजिटल Apprenticeship Contract स्वीकारणे आवश्यक. ✔ Minimum Marks – General/इतर पात्र categories : 60% SC/ST/PwBD : 55% Notification मध्ये 59.99% हे 60% पेक्षा कमी आणि 54.99% हे 55% पेक्षा कमी मानले जाईल असे स्पष्ट केले आहे. Note : Graduation ही eligibility आहे; मात्र merit तयार करताना 12वी/HSC/10+2/Diploma मधील percentage वापरले जाणार आहे. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Government of India ने मान्यता दिलेल्या University मधून कोणत्याही शाखेतील Graduation Degree किंवा Central Government ने मान्य केलेली equivalent qualification असावी. ✔ निवडलेल्या State ची local language आवश्यक आहे. 10वी किंवा 12वीच्या Marksheet/Certificate मध्ये संबंधित local language शिकल्याचा पुरावा असल्यास स्वतंत्र Local Language Test द्यावा लागणार नाही. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| ✔ Apprenticeship Training (12 महिने) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- nats.education.gov.in वर नोंदणी करा आणि प्रोफाइल 100% पूर्ण करा. Enrollment ID जपून ठेवा.
- www.canarabank.bank.in → Careers → Recruitment → Engagement of Graduate Apprentices FY 2026-27 या लिंकवर जा.
- “Click Here for New Registration” वर क्लिक करून मूलभूत माहिती भरा. Provisional Registration Number व Password मिळेल.
- NATS Enrollment ID, शैक्षणिक माहिती, राज्य व जिल्हा प्राधान्य भरा (फक्त एकच राज्य).
- स्कॅन कागदपत्रे अपलोड करा: फोटो (20-50 KB), सही (10-20 KB), डाव्या अंगठ्याचा ठसा (20-50 KB) आणि इंग्रजीत हस्तलिखित घोषणापत्र (50-100 KB). सही व घोषणापत्र CAPITAL LETTERS मध्ये नसावे.
- Final Submit पूर्वी सर्व माहिती तपासा, कारण नंतर बदल करता येणार नाही.
- लागू असल्यास ₹500 शुल्क ऑनलाइन भरा (SC/ST/PwBD साठी शुल्क नाही).
- अर्जाची प्रिंट व e-receipt जतन करा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. Canara Bank Apprentice Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 3500 जागा आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 205 जागा आहेत.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
👉 ऑनलाइन अर्ज 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होतील आणि 17 ऑक्टोबर 2026 ही शेवटची तारीख आहे.
Q3. शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 कोणत्याही शाखेतील पदवी, जी 01.01.2023 ते 01.09.2026 दरम्यान उत्तीर्ण केलेली असावी.
Q4. वयोमर्यादा किती आहे?
👉20 ते 28 वर्षे (01.09.2026 रोजी). SC/ST ला 5, OBC (NCL) ला 3, PwBD ला 10 वर्षांची सूट आहे.
Q5. स्टायपेंड किती मिळेल?
👉दरमहा ₹16,650 (बँक ₹10,500 आणि सरकारकडून DBT द्वारे ₹6,150).
Q6. अर्ज शुल्क किती आहे?
👉SC/ST/PwBD साठी शुल्क नाही. इतर उमेदवारांसाठी ₹500 आहे.
Q7. लेखी परीक्षा होणार आहे का?
👉नाही. निवड 12वी/डिप्लोमा गुणांच्या मेरिटवर होते. यानंतर कागदपत्र पडताळणी, स्थानिक भाषा चाचणी आणि वैद्यकीय तपासणी होते.
Q8. अप्रेंटिसशिपनंतर बँकेत कायमची नोकरी मिळते का?
👉नाही. बँकेवर कायमस्वरूपी नोकरी देण्याचे बंधन नाही. कालावधी 12 महिने आहे आणि शेवटी NATS संयुक्त प्रमाणपत्र मिळते.
Q9. एकापेक्षा जास्त राज्यांसाठी अर्ज करता येतो का?
👉नाही. फक्त एकाच राज्याची निवड करता येते. महाराष्ट्रासाठी मराठी भाषेची चाचणी लागू आहे.
Q10. आधी अप्रेंटिसशिप केलेले उमेदवार अर्ज करू शकतात का?
👉नाही. जे आधी कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप करून चुकले आहेत किंवा सध्या करत आहेत, तसेच ज्यांना पदवीनंतर 1 वर्ष किंवा अधिक नोकरीचा/प्रशिक्षणाचा अनुभव आहे, ते पात्र नाहीत.





