Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

CSIR NCL Pune Bharti 2026 : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या 24 पदांसाठी भरती | 10वी पास | Apply Online

  • October 05, 2026
CSIR NCL Pune Bharti 2026 : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या 24 पदांसाठी भरती | 10वी पास | Apply Online

CSIR NCL Pune Recruitment 2026 :

CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), पुणे यांच्या वतीने Multi-Tasking Staff (MTS) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 24 पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी/SSC किंवा समतुल्य आहे. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार CSIR च्या अधिकृत वेबसाईट https://recruit.ncl.res.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2026 आहे. या पदासाठी Pay Level-1 असून जाहिरातीनुसार किमान वेतनश्रेणी ₹18,000 ते ₹56,900 आणि अंदाजे एकूण परिलब्धी ₹40,000 प्रतिमहिना आहे

या पोस्टमध्ये तुम्हाला CSIR NCL Pune भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

CSIR NCL Pune Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Raigad Kotwal Recruitment 2026 तसेच Sindhudurg Kotwal Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 24 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
05 ऑक्टोबर 2026 ते 04 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ UR / OBC / EWS : Rs.500/-
✔ SC / ST / PwBD
/ महिला / माजी सैनिक (Ex-Servicemen) : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
04 नोव्हेंबर 2026 रोजी
✔ कमाल वय – 25 वर्षे

(SC/ST – +5 वर्ष सूट, OBC(NCL) +3 वर्ष सूट, Ex-Servicemen – नियमानुसार, PwBD – +10 वर्ष सूट, पात्र विधवा/घटस्फोटित/न्यायालयीन विभक्त महिला – नियमानुसार कमाल 35/40 वर्षांपर्यंत सवलत.
)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी
–
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.18,000/- ते Rs.56,900/- (Pay Level-1)

👉याशिवाय HRA, DA, TAव इतर भत्ते
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ CSIR-National Chemical Laboratory (NCL), पुणे, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Competitive Written Examination
✔ Final Merit List
✔ Document Verification
✔ Appointment
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ SSC / 10वी / Matriculation किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
✔
Desirable Qualification: Intermediate / 12वी उत्तीर्ण
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी 2 वर्ष प्रोबेशन कालावधीसह
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • https://recruit.ncl.res.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • MTS भरतीची जाहिरात (Advt. No. NCL/01-2026/MTS) काळजीपूर्वक वाचा.
  • वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरने नोंदणी (Registration) करा.
  • ऑनलाइन अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि प्रवर्गाची माहिती अचूक भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा:
    • फोटो: JPG, 4–100 KB, 100×100 ते 300×350 px
    • सही: JPG, 2–50 KB, 100×50 ते 200×200 px
    • आधार कार्ड, 10वी गुणपत्रिका, जन्मतारखेचा पुरावा, जात/प्रवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • परीक्षा शुल्क (लागू असल्यास) ऑनलाइन भरा. पेमेंटचे जास्तीत जास्त 6 प्रयत्न करता येतात.
  • अर्ज Final Submit करा. Submit केल्यानंतर बदल करता येत नाही. अर्जाची आणि पेमेंटची प्रिंट स्वतःकडे ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • Passport Size Photograph
  • Signature
  • Aadhaar Card
  • 10वी Mark Sheet/Certificate
  • 12वी Mark Sheet/Certificate, लागू असल्यास
  • ITI Certificate/Mark Sheet, लागू असल्यास
  • Date of Birth Proof
  • Caste/Category Certificate, लागू असल्यास
  • PwBD Certificate, लागू असल्यास
  • NOC & Vigilance Certificate, लागू असल्यास
  • इतर लागू प्रमाणपत्रे

📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)

CSIR-NCL MTS Recruitment 2026 साठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा OMR Based किंवा Computer Based Objective Type Multiple Choice Examination पद्धतीने घेतली जाईल.

परीक्षेचा घटकमाहिती
परीक्षा पद्धतOMR Based किंवा Computer Based Objective Type MCQ Examination
प्रश्नांचे माध्यमEnglish आणि Hindi
परीक्षेचा स्तरइयत्ता 10वी (Class 10th)
एकूण प्रश्न150
एकूण गुण450
परीक्षेचा कालावधी2 तास
बरोबर उत्तर3 गुण
चुकीचे उत्तर1 गुण वजा

विषयनिहाय परीक्षा पद्धती

विषयप्रश्नांची संख्याकमाल गुणनकारात्मक गुण
General Intelligence2575प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
Quantitative Aptitude2575प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
General Awareness50150प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
English Language50150प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा
एकूण150450प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा

महत्त्वाची सूचना

परीक्षेतील प्रश्न English आणि Hindi भाषेत असतील. मात्र English Language विषयातील प्रश्न English भाषेत असतील.

परीक्षेचा स्तर 10वी (Class 10th) असेल. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 3 गुण मिळतील, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. CSIR NCL Pune MTS भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या एकूण 24 जागा आहेत (UR-11, OBC-07, SC-02, ST-01, EWS-03). जागांची संख्या तात्पुरती असून वाढू किंवा कमी होऊ शकते.

Q2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉किमान 10वी/SSC/मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण असणे इष्ट (Desirable) पात्रता आहे.

Q3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

👉ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2026 (सायं. 5:00 वा.) आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज करा.

Q4. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉UR, OBC आणि EWS उमेदवारांसाठी ₹500. महिला, SC, ST, PwBD आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क नाही. भरलेले शुल्क परत मिळत नाही.

Q5. MTS पदाला पगार किती मिळतो?

👉7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-1 (₹18,000 – ₹56,900). HRA सह एकूण अंदाजे वेतन सुमारे ₹40,000 आहे, याशिवाय DA, TA, वैद्यकीय सुविधा, LTC असे लाभ मिळतात.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉निवड फक्त लेखी परीक्षेवर (OMR किंवा CBT) आधारित असेल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. मुलाखत नाही.

Q7. परीक्षेत Negative Marking आहे का?

👉होय. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 गुण वजा होतो, तर प्रत्येक बरोबर उत्तराला 3 गुण मिळतात.

    Share this job