Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

VDGMC Latur Recruitment 2026 : 79 गट ड पदांसाठी भरती | 10वी पास उमेदवारांना संधी | Apply Online

  • August 20, 2026
VDGMC Latur Recruitment 2026 : 79 गट ड पदांसाठी भरती | 10वी पास उमेदवारांना संधी | Apply Online

GMC Latur Bharti 2026 :

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर (VDGMC&H Latur) यांच्यामार्फत गट ड (वर्ग-4) संवर्गातील एकूण 79 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कक्षसेवक, बाह्यरुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, स्वयंपाकी, क्ष-किरण सेवक, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघातविभाग सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, न्हावी व धोबी अशा एकूण 13 पदांचा समावेश आहे. 10वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पात्र व इच्छुक उमेदवारांनी https://www.vdgmclatur.org या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची सुरुवात 20 ऑगस्ट 2026 पासून झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला GMC Latur भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

GMC Latur Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Bank of Baroda LBO Recruitment 2026 तसेच HAL Nashik Apprentice Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
कक्षसेवक – 36 Post
बाह्यरुग्ण विभाग सेवक – 5 Post
शिपाई – 10 Post
माळी – 1 Post
स्वयंपाकी – 4 Post
क्ष-किरण सेवक – 1 Post
प्रयोगशाळा परिचर – 1 Post
रक्तपेढी परिचर – 1 Post
अपघात विभाग सेवक – 4 Post
सहाय्यक स्वयंपाकी – 4 Post
पहारेकरी – 5 Post
न्हावी – 4 Post
धोबी – 3 Post

Total – 79 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
20 ऑगस्ट 2026 ते 10 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ खुला प्रवर्ग – Rs.1,000/-
✔ राखीव प्रवर्ग / मागास प्रवर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – Rs.900/-
✔ माजी सैनिक – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा गणण्याची तारीख: 20 ऑगस्ट 2026
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
✔ मागासवर्गीय प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे

जाहिरातीत दिव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आणि इतर विशेष प्रवर्गांसाठी शासन नियमानुसार स्वतंत्र वयोमर्यादा सवलती नमूद आहेत.
वेतनश्रेणी (Pay Scale):
बहुतेक पदांसाठी – S-1: Rs.15,000/- ते Rs.47,600/- प्रति महिना
स्वयंपाकी आणि न्हावी पदासाठी – S-3: Rs.16,600/- ते Rs.52,400/- प्रति महिना
👉 नियमानुसार इतर भत्ते लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
लातूर, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ Computer Based Test (CBT)
✓ परीक्षेतील गुणांच्या आधारे Merit List
✓ कागदपत्र पडताळणी
✓ आवश्यक वैद्यकीय व इतर पडताळणी
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ उमेदवार महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
माजी सैनिकांसाठी: तांत्रिक/व्यावसायिक अनुभव आवश्यक नसलेल्या पदांसाठी 15 वर्षे सेवा पूर्ण केलेले SSC उत्तीर्ण किंवा तत्सम प्रमाणपत्रधारक अर्ज करू शकतात.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online Linkयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://www.vdgmclatur.org वर जा.
  • भरती विभागातील “गट ड (वर्ग-4) भरती 2026” या जाहिरातीची लिंक शोधा.
  • जाहिरात व परिशिष्ट काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता तपासा.
  • नोंदणी (Registration) करून प्रोफाईल तयार करा.
  • अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे व फोटो/स्वाक्षरी PDF स्वरूपात अपलोड करा.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

📌आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा (10वी गुणपत्रिका/प्रमाणपत्र)
  • जन्मतारखेचा पुरावा
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांग/माजी सैनिक/खेळाडू/अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आधार कार्ड / ओळखपत्र

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)

GMC Latur Bharti 2026 साठी परीक्षा Computer Based Test (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षा एकूण 200 गुणांची असून परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.

परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षेचा प्रकार: Computer Based Test (CBT)
  • एकूण प्रश्न: 100
  • एकूण गुण: 200
  • प्रत्येक प्रश्नासाठी गुण: 2 गुण
  • परीक्षा कालावधी: 120 मिनिटे
  • प्रश्नांचे स्वरूप: वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न
  • निगेटिव्ह मार्किंग: नाही

विषयनिहाय प्रश्न व गुण

विषयप्रश्नगुण
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी व अंकगणित2550
एकूण100200

Mandatory Time-Bound Groups

परीक्षेतील प्रश्न चार वेळेनुसार विभागलेल्या गटांमध्ये (Group A, Group B, Group C आणि Group D) विभागलेले असतील. प्रत्येक गटासाठी 30 मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

  • Group A: 30 मिनिटे
  • Group B: 30 मिनिटे
  • Group C: 30 मिनिटे
  • Group D: 30 मिनिटे

एका गटासाठी दिलेला वेळ संपल्यानंतर उमेदवारास त्या गटातील प्रश्नांकडे पुन्हा परत जाता येणार नाही. त्यानंतर पुढील गट आपोआप सुरू होईल.

Note : उमेदवारांना गुणवत्तायादीसाठी पात्र ठरण्यासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व किमान गुणांची पूर्तता करणे आवश्यक राहील.

📌 GMC Latur Bharti 2026 Syllabus

मराठी

मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार तसेच उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश आहे.

इंग्रजी

इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये Common Vocabulary, Sentence Structure, Grammar तसेच Idioms and Phrases यांचा समावेश आहे.

सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, भारतीय राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान तसेच आरोग्य विषयक सामान्य माहिती यांचा समावेश आहे.

बौद्धिक चाचणी व अंकगणित

बौद्धिक चाचणी व अंकगणित विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक तसेच टक्केवारी या घटकांचा समावेश आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. VDGMC लातूर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 VDGMC लातूर भरती 2026 मध्ये गट ड (वर्ग-4) संवर्गातील एकूण 79 जागा आहेत.

Q2. VDGMC लातूर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.

Q3. या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवार महाराष्ट्र शासनमान्यताप्राप्त 10वी (माध्यमिक शालांत परीक्षा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

Q4. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 खुल्या प्रवर्गासाठी ₹1,000/- व राखीव प्रवर्गासाठी (मागासवर्गीय/EWS) ₹500/- आहे. माजी सैनिकांना शुल्क आकारले जाणार नाही.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉 निवड ही ऑनलाईन संगणकीय परीक्षेतील (CBT) गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या गुणवत्ता यादीनुसार होईल. कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.

Q6. वयोमर्यादा किती आहे?

👉 खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षे (नियमानुसार सूट लागू).

Q7. अर्ज कुठे व कसा करायचा आहे?

👉अधिकृत संकेतस्थळ https://www.vdgmclatur.org वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

    Share this job