Bombay High Court Bharti 2026 : Hardware & Software Engineer पदांसाठी भरती

Bombay High Court Bharti 2026 :
Bombay High Court Recruitment 2026 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर Hardware Engineer आणि Software Engineer पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये प्रत्येक पदासाठी 3 उमेदवारांची Select List आणि 1 उमेदवाराची Wait List तयार करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी S-20 वेतनश्रेणी ₹56,100 ते ₹1,77,500 अधिक नियमानुसार भत्ते देय आहेत.
Hardware Engineer पदासाठी Computer Science/Engineering किंवा संबंधित विषयातील B.E. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. Software Engineer पदासाठी B.E./M.C.A. किंवा Computer Science/संबंधित विषयातील समकक्ष पदवी तसेच संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. इच्छुक पात्र उमेदवार 17 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Bombay High Court भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Bombay High Court Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Bank of Baroda LBO Recruitment 2026 तसेच HAL Nashik Apprentice Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| हार्डवेअर इंजिनिअर (Hardware Engineer) – निवड यादी 3 + प्रतीक्षा यादी 1 सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) – निवड यादी 3 + प्रतीक्षा यादी 1 Total – 8 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 17 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ सर्व प्रवर्गांसाठी : Rs.200/- + लागू Transaction Charges शुल्क State Bank Collect या ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारेच भरावे लागेल. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ सर्वसाधारण (Open) : 25 ते 38 वर्षे ✔ SC/ST/OBC/SBC (महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त) : 25 ते 43 वर्षे ✔ हायकोर्ट/शासकीय कर्मचारी : किमान 25 वर्षे; कमाल वयोमर्यादा लागू नाही. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| S-20: Rs.56,100/- – Rs.1,77,500/- प्रति महिना 👉 नियमानुसार भत्ते |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ औरंगाबाद, महाराष्ट्र |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल. ✓ स्क्रीनिंग टेस्ट (Part I) – 100 गुण 3 तास कालावधी सामान्य ज्ञान व सामान्य इंग्रजी – 30 Marks तांत्रिक विषय (वस्तुनिष्ठ 25Marks + वर्णनात्मक 45Marks) – 70 Marks उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 Marks आवश्यक ✓ प्रात्यक्षिक परीक्षा (Part II – Practical Test) – 50 Marks, किमान उत्तीर्ण Marks 25 ✓ मुलाखत (Part III – Viva-Voce) – 50 Marks |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ Hardware Engineer: Computer Science/Engineering किंवा संबंधित विषयातील B.E. किंवा equivalent Degree + संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा working experience + Computer, Printer आणि Network इत्यादी Hardware Maintenance चे ज्ञान + Server Administration, Network Administration, Leased Lines आणि Video Conferencing यांचा exposure/knowledge. ✓ Software Engineer: Computer Science किंवा संबंधित विषयातील B.E./M.C.A. किंवा equivalent Degree + संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा working experience + Object Oriented Programming आणि Web Technologies मधील programming skill + PHP/PERL, Apache Web Server, Linux Based RDBMS यांचा exposure असल्यास Preference + SDLC Concepts वापरून System Development करण्याची क्षमता. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online Link | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम बॉम्बे हायकोर्टच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://bombayhighcourt.gov.in) जा.
- भरती विभागातील “Hardware Engineer / Software Engineer” जाहिरातीची लिंक शोधा.
- Online Application फॉर्ममध्ये योग्य पद (Post Drop-Box मधून) निवडा.
- आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती काळजीपूर्वक भरा.
- पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी (प्रत्येकी जास्तीत जास्त 40 KB, .jpg/.jpeg स्वरूपात) अपलोड करा.
- State Bank Collect द्वारे रु. 200/- शुल्क ऑनलाईन भरा व Reference Number नोंदवा.
- सर्व माहिती तपासून “I Agree” वर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा (भविष्यातील संदर्भासाठी).
📌आवश्यक कागदपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा – Birth Certificate किंवा 10वीचे Board Certificate
- शैक्षणिक कागदपत्रे – SSC, HSC, Graduation, Post Graduation इत्यादींची Marksheet व Passing Certificate
- CGPA/SGPA/Grade असल्यास – Marks/Percentage Conversion चे अधिकृत प्रमाणपत्र
- Experience Certificate – संबंधित Employer कडून जारी केलेले; त्यात नाव, Exact Designation, Pay Scale/Pay, Employment Period, Duration, Signature, Date आणि Seal असणे आवश्यक
- Caste Certificate – आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांसाठी
- Domicile Certificateनाव बदलाचा पुरावा – विवाहित महिला उमेदवाराने लग्नानंतर नाव बदलले असल्यास Gazette/Marriage Certificate इ.
- Small Family Declaration – जाहिरातीतील prescribed format मध्ये
- 2 Character Certificates – जाहिरातीतील prescribed proforma मध्ये दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून
- NOC – Government Office मध्ये कार्यरत उमेदवारांसाठी
- इतर आवश्यक कागदपत्रे – Application Form मधील माहितीशी संबंधित किंवा Selection Committee ने मागितलेली कागदपत्रे.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. मुंबई हायकोर्ट औरंगाबाद भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू आहे?
👉 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17/08/2026 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होऊन 31/08/2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत सुरू राहील.
Q2. या भरतीसाठी परीक्षा शुल्क किती आहे?
👉 सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. 200/- असून ते बँकेच्या ट्रान्झॅक्शन चार्जेससह State Bank Collect द्वारे भरावे लागेल.
Q3. हार्डवेअर इंजिनिअर व सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 दोन्ही पदांसाठी संबंधित विषयातील B.E./M.C.A. किंवा समकक्ष पदवी आणि 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
Q4. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉 स्क्रीनिंग टेस्ट (100 गुण), प्रात्यक्षिक परीक्षा (50 गुण) आणि मुलाखत (50 गुण) अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल.
Q5. वयोमर्यादा किती आहे?
👉 सर्वसाधारण प्रवर्गासाठी 25 ते 38 वर्षे, तर मागासवर्गीयांसाठी 25 ते 43 वर्षे वयोमर्यादा आहे.
Q6. दोन्ही पदांसाठी एकाच वेळी अर्ज करता येईल का?
👉 होय, मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र शुल्क भरणे आवश्यक आहे.
Q7. निवड झाल्यास वेतन किती मिळेल?
👉निवड झालेल्या उमेदवारांना S-20 वेतन मॅट्रिक्सनुसार रु. 56,100 ते 1,77,500 अधिक नियमानुसार भत्ते मिळतील.





