जिल्हा व सत्र न्यायालय बीड भरती 2026 : सफाईगार पदासाठी ऑफलाइन अर्ज सुरू | 7वी उत्तीर्णांना संधी

जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 :
जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदासाठी भरती प्रक्रिया 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 2 जागा भरल्या जाणार असून, पुढील 2 वर्षांत रिक्त होणाऱ्या आणखी 3 जागांसाठी सुद्धा प्रतिक्षा यादी तयार केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026, सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत असून अर्ज केवळ स्पीड पोस्टाने स्वीकारला जाईल.
या पोस्टमध्ये तुम्हाला जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी UPSC Principle and Vice Principle Recruitment 2026 तसेच AIIMS Nursing Officer Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ सफाईगार (Sweeper) – 02 Post Note : पुढील 2 वर्षांत रिक्त होणाऱ्या पदांसाठी देखील निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 27 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026 परीक्षा/मुलाखत : नंतर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ सर्व उमेदवारांसाठी – Rs.500/- Note : शुल्क Postal Order किंवा Demand Draft द्वारे “DISTRICT AND SESSIONS COURT, BEED” यांच्या नावाने भरावे. शुल्क परत मिळणार नाही. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ खुला प्रवर्ग – 18 वर्षे ते 38 वर्षे ✔ मागासवर्ग – 18 वर्षे ते 43 वर्षे ✔ राज्य/केंद्र सरकारी कर्मचारी – किमान 18 वर्षे (कमाल वयोमर्यादा लागू नाही – जाहिरातीनुसार) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ S1: Rs.15,000/- ते Rs.47,600/- प्रति महिना |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Test) ✔ शारीरिक क्षमता चाचणी ✔ वैयक्तिक मुलाखत एकूण गुण : 50 (30 + 10 + 10) |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ उमेदवार किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा. ✔ उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी. ✔ उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक. ✔ शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. न्यायालयात काम केल्याचा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑफलाईन (Offline) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| बीड, महाराष्ट्र |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Offline Form Link | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://beed.dcourts.gov.in
- परिशिष्ट ‘अ’ अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
- अर्ज A-4 आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदावर स्वच्छपणे टंकलिखित किंवा संगणकीकृत टाईप करून भरा.
- अर्जामध्ये अद्ययावत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवा व त्यावर स्वाक्षरी करा.
- ₹500/- चा पोस्टल ऑर्डर/डिमांड ड्राफ्ट “DISTRICT AND SESSIONS COURT, BEED” या नावाने काढा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं-प्रमाणित छायांकित प्रती जोडा.
- लिफाफ्यावर स्पष्टपणे “सफाईगार पदासाठी अर्ज” असे नमूद करा.
- अर्ज खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टाने पाठवा: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, बीड, नगर रोड, बीड – 431122
- अर्ज 10 ऑगस्ट 2026, सायंकाळी 6:00 वाजेपूर्वी पोहोचेल याची खात्री करा.
📌 आवश्यक कागदपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / SSC बोर्ड प्रमाणपत्र)
- शैक्षणिक पात्रता परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (7वी, 10वी, 12वी इत्यादी)
- सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास त्या संबंधीचा दाखला
- दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र (परिशिष्ट ब)
- लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र (परिशिष्ट क)
- सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी)
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- सेवायोजन कार्यालय नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास)
- शासकीय कर्मचारी असल्यास ना-हरकत प्रमाणपत्र
- विवाहित महिलांसाठी नाव बदलाबाबतचा पुरावा
- आधार कार्ड
- मूळ ओळखपत्र (मतदार कार्ड/पॅन कार्ड/आधार कार्ड/वाहन परवाना यापैकी एक)
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. जिल्हा व सत्र न्यायालय बीड सफाईगार भरतीत एकूण किती जागा आहेत?
👉सध्या 2 जागा रिक्त असून पुढील 2 वर्षांत आणखी 3 जागा रिक्त होणार आहेत.
Q2.या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 उमेदवार किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा.
Q3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 10 ऑगस्ट 2026, सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत.
Q4. अर्ज कोणत्या पद्धतीने पाठवावा लागेल?
👉अर्ज फक्त स्पीड पोस्टाने (Speed Post) पाठवावा लागेल. पोस्ट, कुरियर किंवा हाताने आणलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Q5. अर्ज शुल्क किती आहे व कसे भरावे?
👉सर्व प्रवर्गांसाठी ₹500/- अर्ज शुल्क असून ते “DISTRICT AND SESSIONS COURT, BEED” नावाने काढलेल्या पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरावे लागेल.
Q6. वेतन श्रेणी काय आहे?
👉S-1 वेतन श्रेणीनुसार ₹15,000 – ₹47,600 इतके वेतन दिले जाईल.
Q7. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉प्रात्यक्षिक परीक्षा (30 गुण), शारीरिक क्षमता चाचणी (10 गुण) आणि वैयक्तिक मुलाखत (10 गुण) अशा तीन टप्प्यांत निवड होईल. एकूण 50 गुणांपैकी किमान 25 गुण आवश्यक.
Q8. या पदासाठी भविष्यात पदोन्नती मिळते का?
👉नाही, सफाईगार हे एकाकी पद (Isolated Post) असून यास पदोन्नतीची संधी नाही.
Q9. अर्जाचा नमुना कुठे मिळेल?
👉अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://beed.dcourts.gov.in) उपलब्ध आहे.





