Dayalbagh Educational Institute (DEI) Recruitment 2026 : 128 Teaching & Non-Teaching पदांची भरती | Apply Online

DEI Bharti 2026 :
दयालबाग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी), आग्रा यांनी Advt No. 09 DEI – जुलै 2026 अंतर्गत एक मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये प्राध्यापक (Professor), सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) तसेच विविध नॉन-टीचिंग पदांसाठी एकूण 128 जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय नागरिक, भारतीय वंशाच्या व्यक्ती (PIO) आणि ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.dei.ac.in वर जाऊन 27 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करायचा आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला DEI भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
DEI Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS CSA Recruitment 2026 तसेच BPCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Teaching Posts (University) – 67 Post ✔ DEI Technical College (Teaching) – 10 Post ✔ DEI P.V. Girls Intermediate College – 5 Post ✔ DEI R.E.I. Intermediate College – 5 Post ✔ Non-Teaching Posts (University) – 35 Post ✔ DEI Technical College (Non-Teaching) – 6 Post Total – 128 Posts |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 28 जुलै 2026 ते 27 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ Teaching Posts – General / UR : Rs.148/- Reserved : Rs.74/- ✔ Non-Teaching (Level 10 ते Level 14) – General : Rs.148/- Reserved : NIL ✔ Other Non-Teaching Posts – General : Rs.71/- Reserved : Rs.36/- |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ REI Intermediate College मधील Principal पदासाठी किमान 30 वर्षे वय आवश्यक. इतर पदांसाठी वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली नाही. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.18,000/- ते Rs.2,18,200/- प्रति महिना (पदानुसार व 7th CPC/UGC नियमांनुसार) भत्ते : अधिकृत नियमांनुसार लागू (जाहिरातीत स्वतंत्रपणे नमूद नाही) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| आग्रा (उत्तर प्रदेश) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ ऑनलाईन अर्जाची छाननी (Screening Committee मार्फत) ✔ पात्र उमेदवारांना Seminar / Presentation / Aptitude Test / Trade Test / Interview साठी बोलावले जाईल ✔ मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक : UGC Regulations 2018 (व त्यानंतरचे सुधारित नियम) किंवा संबंधित पदांसाठी लागू NCTE / AICTE नियमांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक. ✔ मास्टर्स पदवीमध्ये किमान 55% गुण आवश्यक. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC-NCL), PwBD आदी पात्र प्रवर्गांना नियमानुसार 5% गुणांची सूट लागू आहे. ✔ सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी NET / SLET / SET ही किमान पात्रता आहे. मात्र, UGC नियमांनुसार पात्र Ph.D. धारकांना NET / SLET / SET मधून सूट लागू राहील. ✔ Non-Teaching पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामध्ये 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी, B.Ed., अभियांत्रिकी पदवी तसेच काही पदांसाठी टायपिंग स्पीड, स्टेनोग्राफी, संगणक ज्ञान व संबंधित अनुभव आवश्यक आहे. ✔ प्रत्येक पदाची सविस्तर शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर अटी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या आहेत. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| Notification | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट www.dei.ac.in वर जा.
- संबंधित भरती जाहिरात (Advt No. 09 DEI – July 2026) शोधा व लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक ती वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून ऑनलाईन अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट झाल्यावर मिळणाऱ्या लिंकवरून अर्ज नोंदणी शुल्क ऑनलाईन भरा.
- फी भरल्यानंतर अर्जाची PDF प्रत डाउनलोड करून प्रिंट काढा.
- मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे, स्वयं-साक्षांकित प्रती, फी पावती व फोटो सोबत घेऊन जा.
📌 आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
- 10वी पासूनची सर्व शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS/PwBD – लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो (2)
- फी भरल्याची पावती
- नियोक्त्याकडून NOC (नोकरीत असल्यास)
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1.DEI Agra Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2026 आहे.
Q2. DEI Agra भरतीसाठी अर्ज कुठे करावा?
👉 उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.dei.ac.in वर ऑनलाईन अर्ज करावा..
Q3. या भरतीत एकूण किती पदे आहेत?
👉 टीचिंग व नॉन-टीचिंग मिळून एकूण 128 पदे भरली जाणार आहेत.
Q4.अर्ज शुल्क किती आहे?
👉 पदाच्या प्रकारानुसार शुल्क ₹36 ते ₹148 (GST सह) दरम्यान आहे.
Q5. निवड प्रक्रिया काय आहे?
👉 सेमिनार-कम-प्रेझेंटेशन/ऍप्टिट्यूड टेस्ट/ट्रेड टेस्ट/मुलाखत या माध्यमातून निवड केली जाईल.
Q6. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी NET आवश्यक आहे का?
👉 होय, UGC Regulations 2018 नुसार NET/SLET/SET आवश्यक आहे, मात्र काही अटींवर पीएच.डी. धारकांना सूट आहे.
Q7. DEI P.V. Girls Intermediate College मध्ये कोण अर्ज करू शकते?
👉 या कॉलेजमधील टीचिंग पदांसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.





