Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

Indian Coast Guard Recruitment 2026 : 365 जागा | Apply Online

  • October 07, 2026
Indian Coast Guard Recruitment 2026 : 365 जागा | Apply Online

Indian Coast Guard Recruitment 2026 :

भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) Coast Guard Enrolled Persons Test (CGEPT) बॅच 01/2027 व 02/2027 अंतर्गत Navik (General Duty), Navik (Domestic Branch), Yantrik व Hygienist-I या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती Staff Selection Commission (SSC) मार्फत होत असून एकूण 365 तात्पुरत्या जागा आहेत. 10वी, 12वी (गणित-भौतिकशास्त्रासह), ITI किंवा डिप्लोमा पास उमेदवार 06 ऑक्टोबर 2026 ते 21 ऑक्टोबर 2026 (संध्या. 5:30) या काळात www.ssc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पोस्टमध्ये तुम्हाला Indian Coast Guard भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Indian Coast Guard Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IOCL Apprentice Recruitment 2026 तसेच BECIL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
CGEPT-01/2027 :
✔ Navik (General Duty) – 130 जागा
पुरुष – 117
महिला – 13
✔ Yantrik (Mechanical) (फक्त पुरुष) – 28
✔ Yantrik (Electrical) (फक्त पुरुष) – 23
✔ Yantrik (Electronics) (फक्त पुरुष) – 9

CGEPT-02/2027 :
✔ Navik (General Duty) – 130 जागा
पुरुष – 117
महिला – 13
✔ Navik (Domestic Branch) (फक्त पुरुष) – 25
✔ Hygienist-I (फक्त पुरुष) – 20

Total – 365 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
06 ऑक्टोबर 2026 ते 21 ऑक्टोबर 2026

CGEPT-01/27 Stage-I – नोव्हेंबर 2026 च्या सुरुवातीस/मध्यास
CGEPT-01/27 Stage-II – फेब्रुवारी 2027 अखेर
CGEPT-01/27 Stage-III – मे 2027 सुरुवातीस
CGEPT-02/27 Stage-I – ऑक्टोबर 2027 मध्यास
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / EWS / OBC – Rs.550/-
✔ SC/ST – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
✔ Navik GD – जन्म 01 नोव्हेंबर 2005 ते 01 मे 2009 दरम्यान
✔ Yantrik – जन्म 01 मे 2005 ते 01 मे 2009 दरम्यान
✔ Navik DB – जन्म 01 नोव्हेंबर 2005 ते 01 ऑक्टोबर 2009 दरम्यान
✔ Hygienist-I – जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 01 ऑक्टोबर 2009 दरम्यान

(OBC – +03 वर्षे, SC/ST – +05 वर्षे)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Yantrik: Basic Pay Rs.29,200/- (Pay Level-5) + Yantrik Pay ₹6,200/- + DA व इतर भत्ते
✔ Navik (GD): Basic Pay Rs.21,700/- (Pay Level-3) + DA व इतर भत्ते
✔ Navik (Domestic Branch): Basic Pay Rs.21,700/- (Pay Level-3) + DA व इतर भत्ते
✔ Hygienist-I: Basic Pay Rs.21,700/- (Pay Level-3) + DA व इतर भत्ते.

याशिवाय जाहिरातीत Government Accommodation/HRA, Medical सुविधा, Leave, LTC, Pension NPS/UPS, Gratuity, CSD सुविधा आणि ₹75 लाखांचे Insurance Cover यांचा उल्लेख आहे.
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ संपूर्ण भारत (प्रशिक्षण INS Chilka येथे होणार आहे.)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Stage-I: संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा. 100 प्रश्न, प्रत्येकी 1 गुण, वेळ 1 तास, हिंदी व इंग्रजी भाषेत. निगेटिव्ह मार्किंग नाही. उत्तीर्ण गुण: UR/EWS/OBC 40, SC/ST 35.
✔ Stage-II (भरती केंद्रावर):
ओळख व बायोमेट्रिक पडताळणी
शारीरिक क्षमता चाचणी (PFT): 1.6 किमी धावणे (पुरुष 6 मि. 30 सेक., महिला 8 मि.), squats (पुरुष 20, महिला 15), push-ups (पुरुष 15, महिला 10), bent knee sit-ups (पुरुष 15, महिला 10), सर्व चाचण्या खंडाशिवाय सलग
Assessment & Adaptability Test (फक्त पात्रता स्वरूपाची)
कागदपत्र पडताळणी
भरती वैद्यकीय तपासणी
✔ Stage-III (INS Chilka): आधार आधारित ओळख तपासणी, कागदपत्र पडताळणी, नोंदणीपूर्व वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी व इतर कागदपत्रे सादर करणे.
✔ Stage-IV: शैक्षणिक कागदपत्रांची संबंधित बोर्ड/विद्यापीठ/शासनाकडे पडताळणी.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Navik (GD) – 12वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्रासह), COBSE मान्यताप्राप्त बोर्डातून
✔ Navik (DB) – 10वी उत्तीर्ण, COBSE मान्यताप्राप्त बोर्डातून
✔ Hygienist-I – मॅट्रिक किंवा ITI किंवा केंद्र/राज्य सरकार मान्यताप्राप्त बोर्डाचे समकक्ष
✔ Yantrik – 10वी उत्तीर्ण + AICTE मान्यताप्राप्त 3 किंवा 4 वर्षांचा Electrical/Mechanical/Electronics/Telecom (Radio/Power) डिप्लोमा किंवा 10वी व 12वी उत्तीर्ण + 2 किंवा 3 वर्षांचा तोच डिप्लोमा
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा | येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • www.ssc.gov.in या SSC च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि नोंदणी (Registration) करा.
  • वैध ई-मेल आयडी व मोबाइल नंबर वापरा. तो लक्षात ठेवा, कारण पुढील सर्व संपर्क त्यावरच होईल.
  • आधार असल्यास ओळखपत्र म्हणून पहिल्यांदा आधार कार्ड अपलोड करा.
  • वैयक्तिक, शैक्षणिक (सर्व विषयांचे गुण) व श्रेणीची माहिती अचूक भरा.
  • स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा: ताजा रंगीत फोटो (3 महिन्यांपेक्षा जुना नको), सही, 10वी गुणपत्रिका/जन्म दाखला, ओळखपत्र. Navik (GD) पुरुषांसाठी अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • नोंदणीच्या वेळी लाइव्ह फोटो घेतला जाईल, तो अपलोड केलेल्या फोटोशी जुळला पाहिजे.
  • ₹550 परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा (SC/ST ला माफ).
  • प्रिंट प्रिव्ह्यू तपासून अर्ज अंतिम सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.
  • एकाच पदासाठी अर्ज करा. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.

📌 परीक्षा पद्धती

Indian Coast Guard CGEPT 01/2027 आणि 02/2027 भरतीची निवड प्रक्रिया एकूण चार टप्प्यांमध्ये (Stage-I, Stage-II, Stage-III आणि Stage-IV) पार पडते. सर्व टप्प्यांमध्ये पात्र होणे आणि निर्धारित वैद्यकीय निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

Stage-I : Computer Based Examination (CBE)

घटकमाहिती
परीक्षेचा प्रकारComputer Based Examination (CBE)
एकूण प्रश्न100
एकूण गुण100
प्रत्येक प्रश्न1 गुण
परीक्षेचा कालावधी1 तास
प्रश्नांचा प्रकारबहुपर्यायी प्रश्न (MCQ)
भाषाहिंदी आणि इंग्रजी
Negative Markingनाही

Stage-I उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण

श्रेणीकिमान गुण
UR / EWS / OBC40 गुण
SC / ST35 गुण

परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये घेतल्यास उमेदवारांच्या गुणांचे Normalisation केले जाईल आणि Normalised Marks चा वापर Merit आणि Cut-off निश्चित करण्यासाठी केला जाईल.

Stage-II : Recruitment Process

Stage-I मधील Computer Based Examination मधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांना Stage-II साठी Shortlist केले जाईल. Stage-II साधारणपणे 1 ते 2 दिवस चालेल आणि त्यातील चाचण्या qualifying nature च्या असतील.

Stage-II मध्ये खालील चाचण्या असतील:

  1. Basic Identity आणि Biometric Verification
  2. Physical Fitness Test (PFT)
  3. Assessment & Adaptability Test
  4. Document Verification
  5. Recruitment Medical Examination

Physical Fitness Test (PFT)

उमेदवार1.6 Km धावणेSquatsPush-upsBent Knee Sit-ups
पुरुष6 मिनिटे 30 सेकंद201515
महिला8 मिनिटे151010

Note: PFT मधील चारही चाचण्या कोणताही Break न घेता सलग घेतल्या जातील. चाचण्यांमध्ये Break घेतल्यास उमेदवार PFT मध्ये अपयशी ठरेल.

Assessment & Adaptability Test

PFT मध्ये पात्र ठरलेले उमेदवार Assessment & Adaptability Test देतील. ही परीक्षा Online/OMR आधारित असेल. ही चाचणी Qualifying Nature ची असून या परीक्षेतील गुण Final Merit List मध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

Document Verification

Online Application मध्ये दिलेली माहिती आणि उमेदवाराने सादर केलेली मूळ कागदपत्रे यांची पडताळणी केली जाईल. शैक्षणिक प्रमाणपत्रे, Identity Proof, Category Certificate, गुण/CGPA आणि Domicile Certificate इत्यादी तपासले जातील.

कागदपत्रांमध्ये नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, गुण/CGPA, Category Certificate किंवा इतर महत्त्वाच्या माहितीमध्ये तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.

Stage-III

Stage-III मध्ये उमेदवारांची पुढील तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यामध्ये Identity Verification, Biometric Verification, Original Documents Verification आणि Pre-Enrolment Medical Examination यांचा समावेश आहे.

Stage-III मध्ये उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रे, Police Verification संबंधित कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

Stage-IV

Stage-IV मध्ये Stage-III दरम्यान सादर केलेल्या मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची संबंधित Boards / Universities / State Government Authorities यांच्याकडून Verification / Authentication केली जाते.

कागदपत्रे संबंधित प्राधिकरणांकडून Genuine नसल्याचे आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती/सेवा रद्द केली जाऊ शकते.

Indian Coast Guard CGEPT Selection Process

Stage-I CBE → Stage-II PFT + Assessment & Adaptability Test + Document Verification + Medical → Stage-III → Stage-IV Document Verification/Authentication → Final Selection

Note: Stage-I, Stage-II, Stage-III आणि Stage-IV मध्ये पात्र होणे तसेच निर्धारित Medical Standards पूर्ण करणे आवश्यक आहे. अंतिम निवड उपलब्ध रिक्त जागा, Merit आणि संबंधित नियमांनुसार केली जाते.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. तटरक्षक दल भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉CGEPT 01/2027 व 02/2027 मिळून एकूण 365 तात्पुरत्या जागा आहेत. त्यात बॅच 1 मध्ये 190 आणि बॅच 2 मध्ये 175 जागा आहेत.

Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉ऑनलाइन अर्ज 06 ऑक्टोबर 2026 (सकाळी 11:00) पासून 21 ऑक्टोबर 2026 (संध्याकाळी 5:30) पर्यंत स्वीकारले जातील.

Q3. Navik (GD) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉COBSE मान्यताप्राप्त बोर्डातून गणित व भौतिकशास्त्र विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q4. महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

👉होय, पण फक्त Navik (General Duty) पदासाठी. Yantrik, Navik (DB) व Hygienist-I साठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

Q5. Navik (GD) साठी वयोमर्यादा काय आहे?

👉उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2005 ते 01 मे 2009 दरम्यान झालेला असावा. OBC ला 3 वर्षे आणि SC/ST ला 5 वर्षांची सवलत आहे.

Q6. निवड कशी होते?

👉Stage-I ऑनलाइन परीक्षा, Stage-II (PFT, Assessment Test, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी), Stage-III (INS Chilka येथे पडताळणी व वैद्यकीय तपासणी) आणि Stage-IV (कागदपत्रांची शासकीय पडताळणी) अशा टप्प्यांनी निवड होते.

Q7. Yantrik पदाचा पगार किती आहे?

👉मूळ वेतन ₹29,200 (Pay Level-5) आणि Yantrik Pay ₹6,200 अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते मिळतात.

Q8. ऑनलाइन परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

👉ऑनलाइन परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

Q9. अर्ज कुठे करायचा?

👉फक्त ऑनलाइन, SSC च्या www.ssc.gov.in या वेबसाइटवर. पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

    Share this job