Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

Bombay High Court Bharti 2026 : उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती | BHC Recruitment 2026

  • June 17, 2026
Bombay High Court Bharti 2026 : उच्च न्यायालय मार्फत स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरती | BHC Recruitment 2026

Bombay High Court Bharti 2026 :

मुंबई उच्च न्यायालय (मूळ शाखा) अंतर्गत स्वयंपाकी-नि-शिपाई (Cook-cum-Peon) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सातवी उत्तीर्ण असलेले तसेच स्वयंपाकाचा अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून विहित मुदतीत स्पीड पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Bombay High Court भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📌अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – 400032

📌अर्ज पाठविण्याचे माध्यम : स्पीड पोस्ट (Speed Post) द्वारे ऑफलाइन अर्ज पाठवावा.

📌लिफाफ्यावर लिहावे : “स्वयंपाकी-नि-शिपाई पदासाठी अर्ज”

Bombay High Court Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SSC LDC UDC Bharti 2026 तसेच SBI Apprentice Bharti 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
स्वयंपाकी-नि-शिपाई (Cook-cum-Peon) 05 पदे
महत्वाच्या तारखा (Important Dates):
17 जून 2026 ते 06 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
सर्व प्रवर्गांसाठी : ₹1,000/-
Demand Draft द्वारे “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” या नावाने भरायचे आहे.
शुल्क परत मिळणार नाही.
वयोमर्यादा (Age Limit):
✔ खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे
✔ मागास प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे
✔ न्यायालयीन/शासकीय कर्मचारी : कमाल वयोमर्यादा लागू नाही
वेतनश्रेणी (Pay Scale):
₹16,600 ते ₹52,400 प्रति महिना
👉 यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
मुंबई, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.

✓ लेखी परीक्षा – 30 गुण
स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा – 30 गुण
शारीरिक क्षमता चाचणी – 10 गुण
वैयक्तिक मुलाखत – 10 गुण
एकूण गुण : 80
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ किमान 7 वी उत्तीर्ण
✓ मराठी भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक.
✓ मान्यताप्राप्त संस्थेचा Cookery Certificate असल्यास प्राधान्य.
✓ स्वयंपाकाचा अनुभव आवश्यक.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Application Form येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • Step 1: अधिकृत जाहिरात (परिशिष्ट-अ) नीट वाचा व पात्रता तपासा.
    Step 2: अर्जाचा नमुना (परिशिष्ट-अ) स्पष्ट अक्षरात भरा – नाव, पत्ता, मोबाइल, ई-मेल, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती व अनुभव अचूक नमूद करा.
    Step 3: सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित छायाप्रती तयार करा.
    Step 4:BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” च्या नावे ₹1,000/- चा Demand Draft बँकेतून काढा.
    Step 5: अर्ज, कागदपत्रे व DD एकत्र लिफाफ्यात ठेवा. लिफाफ्यावर “स्वयंपाकी-नि-शिपाई पदासाठी अर्ज” असे स्पष्टपणे लिहा.
    Step 6: 6 जुलै 2026 पूर्वी खालील पत्त्यावर Speed Post ने पाठवा:
    मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – 400032
    ⚠️ Speed Post व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

📌अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • जन्मतारखेचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / SSC बोर्ड प्रमाणपत्र)
  • शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (7वी, 10वी, 12वी किंवा कोणतीही पदवी )
  • स्वयंपाक अभ्यासक्रमाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र (असल्यास)
  • स्वयंपाक कामाच्या अनुभवाचा दाखला
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र (परिशिष्ट ब)
  • लहान कुटुंब स्वयं घोषणापत्र (परिशिष्ट क)
  • जात प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी)
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • शासकीय कर्मचारी असल्यास, कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र
  • ₹1,000/- चा Demand Draft “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” च्या नावे
  • दोन पासपोर्ट साईझ फोटो

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. मुंबई उच्च न्यायालय स्वयंपाकी भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

👉 6 जुलै 2026 ही अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे.

Q2. स्वयंपाकी-नि-शिपाई पदासाठी किती जागा आहेत?

👉 एकूण 5 रिक्त जागा असून त्यापैकी 1 जागा दिव्यांगांसाठी आरक्षित आहे.

Q3. परीक्षा शुल्क किती आहे व ते कसे भरायचे?

👉 ₹1,000/- शुल्क Demand Draft स्वरूपात “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” च्या नावे भरायचे आहे.

Q4. Age Limit काय आहे?

👉 सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे.

Q5. ऑनलाइन अर्ज करता येईल का?

👉 नाही. हे पद ऑफलाइन अर्ज पद्धतीने भरले जाते. अर्ज Speed Post द्वारे पाठवणे अनिवार्य आहे.

Q6. निवड प्रक्रियेत कोणते टप्पे आहेत?

👉 लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत – एकूण 80 गुणांसाठी निवड होईल.

Q7. या पदावर पदोन्नती मिळेल का?

👉नाही. हे Isolated Post (स्वतंत्र पद) आहे, भविष्यात पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही.

Q9. परिविक्षा कालावधी किती आहे?

👉 निवड झाल्यानंतर 2 वर्षे परिविक्षा (Probation) कालावधी असेल.

Q10. परीक्षेचे वेळापत्रक कुठे पाहायला मिळेल?

👉 मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केले जाईल.

    Share this job